Summer Makeup Tips : उन्हाळ्यात बर्फासारखा वितळतो मेकअप? या टिप्स वापरा आणि कमाल बघा

खराब झालेला मेकअप आणि घामाने भिजलेला चेहरा बघायचा नसेल तर हे कराच
Makeup Tips For Summer
Makeup Tips For Summeresakal

Makeup Tips : उन्हाळा सुरु झाला आहे आणि सूर्याने चांगलेच ताप द्यायला सुरू केलं आहे. उन्हाळा म्हटलं की भयंकर उकाडा आणि या उकाड्याने लगेच घाम येतो. त्यामुळे साध्या चेहऱ्यानेही फिरणं कठीण असतं. पण, आपण मेकअप करतो तेव्हा तर सर्वात वाईट अवस्था असते. तेव्हा जर आपण काही मिनिटेही विना पंख्याचे किंवा एसीचे राहिलो की घामाघूम होतो आणि आपली मेकअपची सगळी मेहेनत व वेळ वाया जातो.

उन्हाळ्यातील मेकअपच्या काही प्रमुख समस्या म्हणजे केकी फाउंडेशन, अस्ताव्यस्त पसरलेला मस्करा, विस्कटलेले लिपस्टिक, चिकट तेलकट झालेले कपाळ आणि इतर अनेक समस्या येतात. खराब झालेला मेकअप आणि घामाने भिजलेला चेहरा हा उन्हाळ्याचा एक नकोसा भाग आहे.

Makeup Tips For Summer
Makeup Brush : अशी करा मेकअप ब्रशची स्वच्छता; नाहीतर....

अर्थात यावर उन्हाळ्यात मेकअप न करणे हे उत्तर नाही. कुठेही प्रेझेंटेबल दिसायचं म्हटलं की मेकअप करण्यावाचून पर्याय नाही. अशा वेळी उन्हाळ्यात मेकअप कसा करावा हा प्रश्न पडतो. यावर उत्तर आहे की उन्हाळ्यात आपल्याला स्वेट-प्रूफ मेकअप करण्याची गरज असते. म्हणजे आर्द्रता कितीही वाढली तरीही आपला चेहरा नैसर्गिकरित्या, ताजातवाना आणि सुंदर दिसू शकेल.

उन्हाळ्यात सर्वात जास्त इफेक्ट त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होतो. कारण सूर्याची किरणे थेट आपल्या त्वचेवर पडतात. यामुळेच त्वचा तज्ञ सनस्क्रीन वापरण्यास सांगतात. या सीझनमध्ये मेकअपही जास्त काळ टिकत नाही.

Makeup Tips For Summer
Makeup Brush : अशी करा मेकअप ब्रशची स्वच्छता; नाहीतर....

सनस्क्रीन चा वापर करा

मेकअप आणि कंसीलर सेट करण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन वापरू शकता. उन्हाळ्यात सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक आहे. खरं तर, हे आपल्या त्वचेवर पायासारखे कार्य करते. यामुळे तुमचा स्किन टोनही चांगला दिसतो.

वॉटरप्रूफ मेकअप

उन्हाळ्याच्या ऋतूत मेकअप चेहऱ्यावर बराच वेळ राहतो, त्यासाठी तुम्ही वॉटरप्रूफ मेकअप निवडू शकता. वॉटर रेझिस्टन्स मस्कारा आणि लाइनर हा एक चांगला पर्याय असू शकतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला ओलावा किंवा घामामुळे आपल्या चेहऱ्यावरून लाइनर आणि काजल बाहेर पडण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही.

ब्रॉन्झर वापरा

नैसर्गिक लुकसाठी ब्रॉन्झरचा वापर करता येतो. ब्रॉन्झर टॅन दिसणे खूप लोकप्रिय आहे. याची खास बाब म्हणजे प्रत्येक स्किन टोनवर ती चांगली दिसते. यामुळे तुमचा लूक वाढण्यास मदत होते.

Makeup Tips For Summer
Nose Makeup Tips : चाफेकळी नाक प्रत्येकालाच हवंय?; असा द्या नाकाला परफेक्ट शेप!

न्यूट्रल शेड वापरा

आपले गाल, ओठ आणि पापण्यांना हायलाइट करण्यासाठी सिंगल न्यूट्रल शेड वापरा. यामुळे तुमची बॅग तर हलकी राहीलच, शिवाय उन्हाळ्याच्या हंगामासाठी परफेक्ट असा मोनोक्रोमॅटिक लूकही मिळेल.

लाईट मेकअप करा

उन्हाळ्यात हलका मेकअप करा. तसेच पावडर ब्लशचा अजिबात वापर करू नका. यासोबतच त्वचेची काळजी घेण्यासाठी आवश्यक गोष्टींचा समावेश करा, जेणेकरून उष्णतेचा त्वचेवर जास्त परिणाम होणार नाही.

Makeup Tips For Summer
Marathi Actress without Makeup : मराठी अभिनेत्री मेकअप न करता कशा दिसतात?

मेकअप करण्याआधी हे करा

बर्फ लावणे

उन्हाळ्यात मेकअप करताना बर्फ वापरण्याचा पर्यायही सोपा आणि प्रभावी ठरू शकतो. चेहेऱ्याला मेकअपच्या आधी बर्फ लावल्याने केवळ घामाची समस्या कमी होत नाही तर त्वचेला थंडपणा आणि आरामही मिळतो. चेहरा धुतल्यानंतर किंवा मेकअप करण्याच्या काही मिनिटे आधी तुम्ही चेहेऱ्यावर बर्फाचा खडा फिरवू शकता. असे केल्याने घाम येणे कमी होईल आणि मेकअपही बराच वेळ टिकून राहील.

प्रायमर वापरा

तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझिंग केल्यानंतर लगेच चेहेऱ्यावर चांगला प्राइमर लावा. प्राइमरमुळे मेकअप जास्त काळ टिकून राहतो व चेहऱ्याच्या मेकअपसाठी एक बेस तयार करतो. मॅटिफायिंग प्राइमर वापरणे हा तेल-मुक्त आणि उष्णतारोधक मेकअप करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे कारण प्राइमर त्वचेवरील दोष लपवतो व चेहेऱ्यावर अतिरिक्त चमक आणण्यास मदत करतो.

उन्हाळ्यात मेकअप करताना या गोष्टी विसरू नका

  1. मॅट लिपस्टीक वापरा

  2. वॉटर प्रुफ आय लायनर वापरा

  3. मेकअपच्या शेवटी सेटिंग स्प्रे वापरा

  4. पावडर ब्लश वापरू नका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com