उपासमार! भर उन्हात घामाने डबडबलेला 'तो' दगडाला देतोय आकार, पण दगडाला पाझर फुटेना

worker.
worker.

वसई : लॉकडाऊनची झळा छोट्यामोठ्या कारागीरांना बसली असून, अशा कारागीरांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोल्हापुरातून वसईत पोटापाण्यासाठी आलेले नागेश पवार हे दगडी पाटा, वरवंटा बनविण्याचे काम करतात. उन्हाच्या झळा, घामाच्या धारा झेलत दगडाला आकार देणारे नागेश पवार यांच्यावर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. पोटापाण्याच्या चिंतेने गावी न जात येथेच पाटे, वरवंटे बनवत आहेत. 

वसई मुख्य रस्त्याला लागून वसंतनगरी या परिसर आहे. याठिकाणी एका कोपऱ्यात बसून नागेश पवार दररोज पाटे वरवंटे बनविण्याचे काम करत आहेत. दगड घडविताना अंगातून घामाच्या धारा येतात, मात्र पोटाची खळगी भरण्याच्या विचाराने ते काम करत राहातात. टाळेबंदी होण्याअगोदर कर्जत येथून त्यांनी दगड आणले होते. सध्या जातं 900 रुपये , वरवंटा 350  रुपये, तर पाटा 400 रुपये किमतीला ते विकत आहेत. परंतु लॉकडाऊनची झळ त्यांना देखील लागली आहे. तरीही छिन्नी हाती घेऊन न थकता काम करत आहेत. वसईच्या आचोळे डोंगरी येथे त्यांचे कुटुंब राहत आहे. हाताला दुसरं काम उरलं नाही. खिशात पैसे नाहीत भाकर चटणी खाऊन दिवस ढकलत असल्याचे पवार यांनी सांगितले.

वाहतूक कर्मचाऱ्याने दाखवली माणुसकी
वसंतनगरी या सर्कलवर वाहतूक कर्मचारी रमाकांत पाटील हे कर्तव्यावर आहेत. त्यांनी पवार यांची मेहनत पहिली. आपणही त्यांना हातभार लावू असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी पक्षांना पाणी पिण्यासाठी एक साचा तयार करून द्या, जे पैसे होतील ते देतो असे सांगितल्यावर टाळेबंदीत पैसे मिळतील याच समाधान पवार यांच्या चेहऱ्यावर दिसून आलं.

कोल्हापूरला आमचं गाव आहे. मात्र तिथेही रोजगार मिळणार नाही, जाऊन काहीच उपयोग नाही. म्हणून वसईतच काम सुरु ठेवले आहे. मात्र विक्री झाली नाही दोन जणांनीच खरेदी केली आहे. तरीही मालाची विक्री होईल या आशेवर काम करत आहोत.
- नागेश पवार, कारागीर, वसई.

Money crunch Nagesh Pawar's grief is of no use going to the village

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com