Marriage Dates : यंदा लग्नाळूंना पाहावी लागणार वाट, कोणत्या महिन्यात किती मुहूर्त जाणून घ्या

६६ मुहूर्त : यंदा लग्नाळूंना वाट पाहवी लागणार
Marriage Dates
Marriage Dates esakal

कार्तिकी एकादशीला तुळसी विवाहसोहळा घरोघरी पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने लग्नसराई सुरू होते. यावर्षी श्रावण अधिकमासामुळे दिवाळी उशिरा आली आहे. त्यामुळे लग्नसराईलाही उशीर झाला आहे. मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त नसल्याने अनेकांची निराशा झाली असल्याने यंदा लग्नाळूंना वाट पाहवी लागणार आहे.

Marriage Dates
Diwali Makeup Tips : दिवाळीत सुंदर लूक करण्यासाठी 'या' मेकअप टिप्सची घ्या मदत

नोव्हेंबर ते जूनपर्यंत एकूण ६६ मुहूर्त आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी ४४ गोरज मुहूर्त आहेत. मुहूर्त साधण्यासाठी यजमान मंडळींची घाई सुरू झाली आहे. त्यासाठी सभागृह बुकिंग, वाजंत्री, कॅटरर्स बुकिंग करण्यात येत असून कपडे, दागिने खरेदी सुरू करण्यात आली आहे. सभागृहावर लग्नाची तारीख निश्चित केली जात आहे. यावर्षी श्रावण अधिकमास असल्यामुळे दिवाळीचा सण लांबला होता.

Marriage Dates
Skin Care Tips : प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी ‘या’ स्किनकेअर टिप्स करा फॉलो

कार्तिकी एकादशीला तुळसी विवाह झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. त्यामुळे मुहूर्त लांबले आहेत. मुहूर्त साधण्यासाठी गोरज मुहूर्तालाही प्राधान्य दिले जात आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तीन मुहूर्त आहेत. २७, २८ व २९ या तीन मुहूर्तांनंतर डिसेंबरमध्ये आठ मुहूर्त आहेत. नवीन वर्षात मात्र सर्वाधिक मुहूर्त आहेत. जानेवारीत नऊ मुहूर्त आहेत. नवीन वर्षातील मुहूर्त साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Marriage Dates
Womens Health Tips : Vagina तून सतत वास येतोय? मग तुम्ही करताय या चूका, वेळीच सुधारा

यावर्षी एकूण ४४ गोरज मुहूर्त आहेत. मे महिन्यात मुहूर्त नसल्याने गोरज मुहूर्त साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ३ मे ते २८ जून २०२४ पर्यंत लग्नासाठी एकही मुहूर्त नाही. त्यामुळे ५६ दिवस मुहूर्त नसल्यामुळे सभागृह, कॅटरिंग तसेच संबंधित व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. उन्हाळी सुटीत लग्नसमारंभ आयोजित केले जातात, परंतु मुहूर्तच नसल्याने निराशा आली आहे.

Marriage Dates
Skin Care Tips: हिवाळ्यात मऊ त्वचा ठेवण्यासाठी कसा कराल मधाचा वापर? जाणून घ्या

कोणत्या महिन्यात किती मुहूर्त

नोव्हेंबर २७, २८, २९ तर डिसेंबरमध्ये ६, ८, १५, १७, २०, २१, २५ व २६ तसेच जानेवारीमध्ये २.६, ८, १७, २२. २७,२९,३०,३१ आणि फेब्रुवारी महिन्यात १, ४, ६, १४, १७, १८ ला मुहूर्त आहेत.

Marriage Dates
Winter Tips: थंडीच्या दिवसांत चुकूनही खाऊ नका या गोष्टी; बिघडू शकते आरोग्य

यावर्षी अधिकमासामुळे लग्नाचे मुहूर्त लांबले आहेत. मात्र गतवर्षीपेक्षा लग्नाचे मुहूर्त अधिक असून गोरज मुहूर्तही अधिक आहेत.

-धनंजय पदवाड, पंचांग तज्ज्ञ, धामणगावरेल्वे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com