skin
skin sakal

Skin Care: शांत झोप हवीये? मग या’ पदार्थाने रोज पायाच्या तळव्यांना करा मसाज

अनेक लोक डोक्याच्या मसाजसाठी तुपाचा वापर करतात.

तुम्हाला ती म्हण आठवते का खाशील तूप तर येईल रूप…. ही म्हण सर्वांनाच माहीत असेल. तुपाचा वापर भारतीय स्वयंपाकघरात सर्रास केला जातो. तुप भाजी, आमटीला फोडणी देण्यापासून ते पुरणपोळी, भातावर घालून खाल्ल्यावरही तूप एकदम मस्त लागतं. अनेक लोक डोक्याच्या मसाजसाठी तुपाचा वापर करतात. पायाच्या तळव्यांनाही तुम्ही तुपाने मसाज करू शकता.

आरोग्यासाठी तूप अनेक फायदे देते. तुपाने आपल्याला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. चला तर आज जाणून घेऊया रोज कोमट तुपाने तळव्यांना मसाज केल्याने कोणते फायदे होतात.

skin
Health Tips: कोणत्या वेळी दूध पिणे आरोग्यासाठी आहे फायदेशीर? जाणून घ्या

फाटलेल्या टाचा

तुम्ही तुमच्या तळव्यांना कोमट तुपाने मसाज केल्याने टाचांच्या भेगांपासूनही आराम मिळतो. त्वचा यामुळे हायड्रेट होते. तसेच त्वचा मुलायम देखील होते. तुमच्या पायाच्या तळव्यावर तूप लावल्याने टाचांच्या भेगा दुरुस्त होण्यास मदत होते.

झोपेची गुणवत्ता सुधारते

तुम्ही तुमच्या भेगा पडलेल्या टाचांवर तूप लावल्याने तणाव कमी होतो. तुम्हाला यामुळे आराम मिळतो. तुपाने तळव्यांना मसाज केल्याने तुमचा ताण कमी होतो. मसाज केल्याने रक्ताभिसरण देखील सुधारते. तुम्हाला झोप देखील चांगली लागते. तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.

ब्लोटिंगचा त्रास दूर होतो

तुपाची मालिश पायाच्या तळव्यांना केल्याने पचनाशी संबंधित समस्यांपासून देखील आराम मिळतो. सूज येण्याच्या समस्येत आराम मिळतो. तसेच यामुळे गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास दूर होण्यास मदत होते.

skin
Healthy Diet : PCOD आहे पण औषधे खायची नाहीयेत? एकदा Healthy Diet फॉलो करून बघा!

सांधे दुखी

तुपाने तळव्यांना नीट मसाज केल्याने सांधेदुखीपासून देखील तुम्हाला आराम मिळतो. तुम्ही पायाच्या तळव्यावर सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी तूप लावून मसाज करू शकता. हाडेही त्यामुळे मजबूत होतात.

घोरण्याची समस्या दूर होते

महत्वाची गोष्ट म्हणजे घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी घोरण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तळव्यांची मालिश करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com