Winter Care Tips : हिवाळ्यात त्वचेला हेल्दी करण्यासाठी घरच्या घरीच तयार करा, कॉफी फेस पॅक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Care Tips

Winter Care Tips : हिवाळ्यात त्वचेला हेल्दी करण्यासाठी घरच्या घरीच तयार करा, कॉफी फेस पॅक

कॉफी ही आपल्या त्वचेच्या समस्यांकरता देखील तितकीच फायदेशीर आहे. होयं हे खरयं कॉफीच्या या गुणधर्मांविषयीची माहिती खूपच कमी लोकांना आहे. मात्र, हे अगदी खर आहे. कॉफीमध्ये अनेक पोषकद्रव्ये आणि तत्वांचा समावेश आहे. त्यामुळे ही कॉफी आपल्या त्वचेसाठी, टाळूसाठी आणि केसांसाठी खूपच लाभदायी आहे.

एका अभ्यासात हे समोर आलं की, कॉफी ही त्वचेला हेल्दी बनवते. कॅफीइक एसिड हे असे ॲन्टी ऑक्सिडेंट आहे, जे कोलेजन लेव्हल वाढवते. यामुळे एक प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही. आता अनेक ब्युटी प्रोडक्टमध्ये कॉफीचा वापर होत आहे. यासोबतच व्हिटॅमिन- ई देखील फायदेशीर आहे.

हेही वाचा: Winter Recipe : पारंपरिक पद्धतीने ओल्या हळदीचे लोणचे कसे तयार करायचे?

हिवाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे  त्वचेचे तीन प्रकार आहेत. थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या जाणवतील. त्यामुळे जर तुम्हाला स्किनवर ग्लो आणायचा असेल तर तुम्ही या कॉफी फेस पॅकचा वापर करू शकता.  हा फेसपॅक तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. 

हेही वाचा: Winter Health Tips: हिवाळ्यात गोड आंबट बोर खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

कॉफी फेस पॅक कसा तयार करायचा?

कॉफी फेस पॅक तयार करण्यासाठी कॉफी मध, दूध आणि हळद पावडर एका वाटीमध्ये घेऊन मिक्स करा. त्यानंतर एका ब्रशने किंवा हाताने मिक्स केलेला हा पॅक चेहऱ्यावर लावा. पॅक 10 मिनीटे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धूतल्यानंतर टॉव्हेलने चेहरा पुसा.   

हेही वाचा: Winter Health Care: हिवाळ्यात चुकूनही सॉक्स घालून झोपू नका; होऊ शकतो हा त्रास...

कॉफी फेस पॅक लावायचे फायदे 

1) त्वचेवरील डेड सेल्स  जातील. 

2) चेहऱ्यावर ग्लो येतो. 

3) चेहऱ्यावरील डाग निघून जातात.