मानसिक आरोग्यासाठीच्या सवयी

चांगले मानसिक आरोग्य याचा अर्थ नेहमी आनंदी राहणे आवश्यक नाही.
mental health
mental healthsakal

- डॉ. मलिहा साबळे, मानसिक आरोग्यतज्ज्ञ, संस्थापक व संचालक - द हेल्दी माइंड

चांगले मानसिक आरोग्य याचा अर्थ नेहमी आनंदी राहणे आवश्यक नाही. चांगले मानसिक आरोग्य असलेल्या स्त्रिया आनंद आणि दुःख, राग आणि उत्साह या सर्व गोष्टी निरोगी मार्गांनी अनुभवू शकतात. तुम्हाला मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी चांगल्या सवयी लागतात, तेव्हा तुमचे मन त्याची सर्व कार्ये योग्यरित्या पार पाडू शकते.

तुमच्या मानसिक आरोग्याचे व्यवस्थापन करण्याच्या या सवयी मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणू शकतात. अर्थात एका महिलेसाठी जी सवय उपयोगी पडेल, ती दुसरीला लागू होईलच असे नाही. त्यामुळे आपल्या आवडीनुसार स्वतःसाठी योग्य सवयी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करा.

या गोष्टी नक्की करा

  • दररोज किमान पंधरा मिनिटे सूर्यप्रकाश मिळवा. तो तुम्हाला व्हिटॅमिन डी देईल आणि तुमचा मूड वाढवेल.

  • जमेल तेव्हा अर्धा तास निसर्गात घालवा. उद्यानाच्या पायवाटेवर असो, नदीचा मार्ग असो किंवा समुद्रकिनारा असो, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा प्रयत्न नक्की करा.

  • तुमच्या स्थानिक भागात काय आहे ते शोधून एक छोटी सहल करा. अशा प्रकारे डोळ्यांसमोरचे दृश्य बदलण्याचा अनुभव घेतल्यास खूप आवश्यक प्रोत्साहन मिळू शकते आणि चिंता कमी होऊ शकते.

  • गॅजेट्समधून अनप्लग करा. तुमचा स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप बंद करा आणि इतर गोष्टी करा. त्यामुळे संदेशांचा सतत प्रवाह थांबेल.

  • क्षमा करण्याचा सराव करा. जे इतरांना आणि स्वतःलाही क्षमा करतात त्यांचे मानसिक आरोग्य चांगले होते.

  • मित्र आणि कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोचत राहाल याची खातरजमा करा. तुमच्या जवळच्यांशी कनेक्टेड राहा, हसा, शेअर करा आणि नवीन आठवणी निर्माण करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com