- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
आजच्या धावपळीच्या, तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक महिलांना मानसिक ताण, नैराश्य, चिंता, नकारात्मक विचार आणि झोप न येण्याच्या तक्रारी वाढत आहेत. घर, करिअर, मुलांची जबाबदारी, कुटुंबीयांच्या अपेक्षा यामुळे मेंदूला सतत ताणाचा सामना करावा लागतो. ही लक्षणं पुढे नैराश्यात बदलू शकतात. यावर उपाय आहे तो म्हणजे योग, प्राणायाम, ध्यान आणि शिस्तबद्ध दिनचर्या.