Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

काय आहे Met Gala 2024 ची थीम?
Met Gala 2024 :
Met Gala 2024 : esakal

Met Gala 2024 :

Met Gala 2024 मध्ये अनेक स्टार हजेरी लावत असतात. त्यात काही उद्योगपतीही असतात. वेगवेगळे स्टनिंग लुक्स यावेळी रेड कार्पेटवर पहायला मिळतात. यंदा या रेड कार्पेटवर अंबानी कुटुंबातील लाडकी परी ईशा अंबानीचीच चर्चा जास्त होतेय. त्याला कारणही तसेच आहे.

याचे कारण आहे ईशाने घातलेला ड्रेस. गोल्डन रंगाच्या फुलांचे भरगच्च डिझाईन असलेला ड्रेस घालून ईशा रेड कार्पेटवर गेली. ईशाचा हा युनिक ड्रेस Anaita Shroff Adajania ने स्टाईल केला होता. तर, प्रसिद्ध डिझाइनर राहुल मिश्रा यांनी तो डिझाइन केला होता. Met Gala 2024 मध्ये ईशा अंबानीचा लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (Isha ambani met gala 2024)

Met Gala 2024 :
Isha Ambani Baby Name : ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांच्या हटके नावांचा अर्थ माहितीये?

महिलांच्या मनाचा ठाव घेणारा साजेसा रंग, त्यावरील हाताने विणलेले फुलांचे वर्क याने खरंच प्रत्येकीला असा ड्रेस घालावा असे वाटले असेल. तर ईशाचा हा ड्रेस बनवायला एक दोन दिवस नाहीतर तब्बल १० हजार तास लागले आहेत.  अनैता श्रॉफ अदजानियाने इंस्टाग्रामवर ईशा अंबानीचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

काय आहे Met Gala 2024 ची थीम?

ईशा अंबानीचा इंडो-वेस्टर्न गाऊन खास Met Gala 2024 च्या थीम 'The Garden Of Time' साठी डिझाइन करण्यात आला होता. तिचा हा सुंदर ड्रेस कार्यक्रमाच्या थीमला रिप्रेझेंट करत होता.

थीम लक्षात घेऊन निसर्ग आणि जीवनचक्राचा समावेश ईशा अंबानीच्या या कस्टम लूकमध्ये करण्यात आला आहे. ईशा अंबानीच्या सोनेरी चमकदार ड्रेसला एक लांब पल्लू देण्यात आला आहे. ज्यावर हेवी फ्लोरल पॅच वर्क आहे. हे वर्क ती परिकथेतील अप्सराच असल्याचे भासवते.

The theme of the Met Gala 2024
The theme of the Met Gala 2024Esakal
Met Gala 2024 :
Nita Ambani and Isha Dance: 'घर मोरे परदेसिया' गाण्यावर नीता अंबानींचा लेकीसोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल

अनैताने कॅप्शनमध्ये ड्रेसचे डिटेलिंगही शेअर केले आहे. ईशा अंबानीचा साडीचा गाऊन हाताने भरतकामाच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. या ड्रेसवर फुलं, फुलपाखरे आणि ड्रॅगनफ्लायसह सुशोभित केलेले आहे. ड्रेसवर विविध प्रकारच्या कारागिरीने नक्षीकाम करण्यात आले आहे.

यामध्ये जरदोजी, नक्षी, फरीशा अशा स्वरूपाचे काम करण्यात आले आहे. शेकडो स्थानिक कारागीर आणि विणकरांच्या मदतीने हा गाऊन तयार करण्यात आला आहे.

The theme of the Met Gala 2024
The theme of the Met Gala 2024Esakal
Met Gala 2024 :
Isha Ambani: ना रणवीर-दीपिका ना रणबीर-आलिया; 'या' सेलिब्रिटी कपलने विकत घेतला ईशा अंबानीचा आलिशान बंगला

ईशाच्या ज्वेलरी आणि क्लचचीही चर्चा

ईशा अंबानीच्या सुंदर इंडो-वेस्टर्न गाऊनसोबतच तिची ज्वेलरीही अप्रतिम आहे. तिने चोकर स्टाइल नेकलेस आणि मॅचिंग इअररिंग्स घातल्या आहेत. ज्वेलरीच नाहीतर मेकअपनेही तिची शोभा वाढली आहे. ईशाने या लुकवर लाईट मेकअप केला आहे.

ईशाचा ड्रेस जितका सुंदर आहे तितकाच तिची ज्वेलरीही मनमोहक आहे. ईशाने घेतलेला क्लच गोल्डन रंगाचा असून त्यावर एका प्रसिद्ध चित्रकाराने चित्र काढले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com