Nita Ambani and Isha Dance: 'घर मोरे परदेसिया' गाण्यावर नीता अंबानींचा लेकीसोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल

अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये निता अंबानी (Nita Ambani) आणि ईशा अंबानी (Isha Ambani) या डान्स करताना दिसत आहे.
Nita Ambani and Isha Dance
Nita Ambani and Isha Danceesakal

Nita Ambani and Isha Dance: अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant ) यांच्या प्री-वेंडिंग सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक ते तीन मार्चच्यादरम्यान अनंत आणि राधिका यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स जामनगरमध्ये पार पडले. या फंक्शनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी परफॉर्म केलं. अशातच आता अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये निता अंबानी (Nita Ambani) आणि ईशा अंबानी (Isha Ambani) या दोघी 'घर मोरे परदेसिया' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नीता अंबानी आणि ईशा या दोघी शिमरी आऊटफिटमध्ये डान्स करताना दिसत आहेत.अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये नीता अंबानी आणि ईशा यांनी 'कलंक' या चित्रपटातील 'घर मोरे परदेसिया' या गाण्यावर डान्स केला.

पाहा व्हिडीओ:

Nita Ambani and Isha Dance
Deepika Padukone: अनंत अंबानी- राधिकाच्या 'प्री वेडिंग' फंक्शनमध्ये 'मॉम टू बी' दीपिकाचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

प्री-वेडिंग फंक्शनमध्ये कलाकारांनी केलं परफॉर्म

अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता रणवीर सिंग, जान्हवी कपूरपासून सारा अली खान यांनी प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म केलं. तसेच शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यावर डान्स केला.

तीन खान थिरकले

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये तीन खान नाटू नाटू या गाण्यावर नाचले. त्यांच्या या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांची 'नाटू नाटू' या गाण्यातील हुक स्टेप तिघे करताना दिसले.

रिहानाच्या परफॉर्मन्सची चर्चा

अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये गायिका रिहानानं देखील परफॉर्म केलं. प्री वेडिंगमध्ये परफॉर्म करायला रिहानानं तब्बल 52 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे, असं म्हटलं जात आहे. तसेच दिलजीत दोसांझनं देखील परफॉर्म केलं. दिलजीतनं अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये गायलेल्या गाण्यावर सर्व कलाकार थिरकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com