मायक्रोन्युट्रियंट्स शरीराचे पोषणकर्ते हिरो!

आपण आतापर्यंत कर्बोदके, प्रथिने व चरबी या कॅलरिजच्या रूपात कार्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऊर्जेचा पुरवठा करणाऱ्या मॅक्रोन्युट्रियंट्सची चर्चा केली.
Micronutrients
Micronutrientssakal

- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

आपण आतापर्यंत कर्बोदके, प्रथिने व चरबी या कॅलरिजच्या रूपात कार्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऊर्जेचा पुरवठा करणाऱ्या मॅक्रोन्युट्रियंट्सची चर्चा केली. याव्यतिरिक्त आपल्या शरीराला सूक्ष्म पोषणतत्वांची गरज असते, जे मायक्रोन्युट्रियंट्स म्हणून ओळखले जातात. हे मायक्रोन्युट्रियंट्स आपल्याला आवश्यक ती ऊर्जा पुरवण्यास मदत करतात. कसे ते पाहू.

सूक्ष्मपोषणतत्त्वे आपल्या शरीराला अतिशय कमी प्रमाणात आवश्यक असणाऱ्या, मात्र योग्य कार्यासाठी अपरिहार्य असणाऱ्या निरनिराळ्या जीवनसत्वे व क्षार यांना वेढून असतात. आपली वाढ, चयापचय व एकंदर चपळतेसाठी आवश्यक या विविध जैवरासायनिक प्रतिक्रियेसाठी ते मध्यस्थाचे काम करतात.

‘मॅक्रोन्युट्रियंट्स’ ज्याप्रमाणे कॅलरिजच्या रूपात थेट ऊर्जा पुरवतात त्याप्रमाणे ‘मायक्रोन्युट्रियंट्स’ ऊर्जेच्या उत्पादनात थेट सहभाग घेत नाहीत, तर ते अशी प्रक्रिया करतात जे मायक्रोन्युट्रियंट्सना वापरात येणाऱ्या ऊर्जेत बदलते.

जीवनसत्वे अ, ब, क, ड, ई व के ही शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक असणारी सेंद्रिय संयुगे आहेत. उदाहरणार्थ, जीवनसत्त्व ‘अ’ दृष्टी, रोगप्रतिकारशक्ती व त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. जीवनसत्त्व ‘क’ अॅंटिऑक्सिडंटचे काम करून रोगप्रतिकारशक्ती वाढवते व कोलेजन संश्र्लेषण करते जे आपल्या केस व त्वचेसाठी गरजेचे असते.

याउलट, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, झिंक व पोटॅशियम यांसारखे क्षार हे अजैविक पदार्थ असून, ते हाडांच्या आरोग्यासाठी, प्राणवायूचे चलनवलन, स्नायूंची हालचाल व मज्जातंतूंच्या संकेतांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रतिकारशक्तिला मदत करणे आणि हार्मोन नियंत्रणापासून अॅंटिक्सिडंट्स व एंझाइम्सच्या निर्मितीपर्यंत मायक्रौन्युट्रियंट्सना पेशींच्या आरोग्याचा कणाच म्हटले पाहिजे. या आवश्यक पोषणतत्त्वांची कमतरता आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण करू शकते. थकवा आणि बौद्धिक कमतरतेपासून क्षीण प्रतिकारशक्ती व संसर्गासाठी अतिसंवेदनशीलतेपर्यंत.

मायक्रोन्युट्रियंट्स महत्त्वाचे असण्याचे एक कारण म्हणजे तीव्र, जुनाट रोगांपासून बचाव करण्याची त्यांची क्षमता. उदा. जीवनसत्व ‘क’ आणि ‘ई’, सेलेनियम व झिंक यांसारख्या क्षारांबरोबर योग्य प्रमाणात घेतल्यास हानिकारक फ्रिरॅडिकल्सचा प्रतिबंध करू शकतात. त्यामुळे हृदयविकार, कॅन्सर आणि मज्जातंतूंची क्षिती यांसारख्या रोगांचा धोका कमी होतो. याबरोबरच ‘ड’ जीवनसत्त्वासारखे मायक्रोन्युट्रियंट्स व सोबत कॅल्शिअमसारखे क्षार हाडांची घनता नियंत्रणात ठेवून हाडे ठिसूळ होणे दूर ठेवते.

वाढ आणि विकासाच्या मदतीमध्ये, विशेषतः बाल्यावस्था व पौगंडावस्थेत मायक्रोन्युट्रियंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य प्रमाणात बी कॉम्प्लेक्ससारखे जीवनसत्त्व आणि लोह, झिंक यांसारखे क्षार प्रतिकारशक्ती व शरीराची एकूण वाढ यांसाठी महत्त्वाचे असतात. विशेषतः गर्भवती महिलांना गर्भाच्या सुदृढ वाढीसाठी व बाळंतपणातील दोष टाळण्यासाठी मायक्रोन्युट्रियंट्सच्या वाढीव मात्रेची गरज असते.

शरीराची मायक्रोन्युट्रियंट्सची मागणी वय, लिंग, आरोग्य व जीवनशैली यांवर अवलंबून असते. बरेच मायक्रोन्युट्रियंट्स फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, चरबीरहित मांस व दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या समतोल आहारातून मिळतात. मात्र काहींना आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म पोषणतत्त्वांची गरज असू शकते. व्हेगन्स किंवा एखाद्या पदार्थाची अॅलर्जी असणारे, कमतरता दूर करण्यासाठी दिलेल्या जीवनसत्त्वे व क्षारांमुळे फायदा घेऊ शकतात.

सूक्ष्म पोषणतत्त्वांनी पुरेपूर समतोल व वैविध्यपूर्ण आहार घेण्यास प्राधान्य दिल्यास आपल्या शरीरास गरज असणाऱ्या आवश्यक पोषणतत्त्वांची पूर्तता आपल्या शरीरास होते. आपल्या पोषणतत्त्वांच्या गरजा अधिक जाणून घेण्यासाठी आहारतज्ञांना भेटावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com