esakal | केसांना मेहंदी लावताना 'ही' चूक अजिबात करू नका

बोलून बातमी शोधा

केसांना मेहंदी लावताना 'ही' चूक अजिबात करू नका
केसांना मेहंदी लावताना 'ही' चूक अजिबात करू नका
sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : केसांना मेंदी लावताना काही काळजी घेणे आवश्यक आहे जर आपण काही चुका केल्या तर केसावर मेहंदी अजिबात चढत नाही...उन्हाळ्यामध्ये जास्त करून राहिला केसांना लावण्यासाठी मेहंदी चा वापर करतात यामुळे केसांना फक्त चमक येत नाही केसही चांगले राहतात. मेहंदी भिजवताना आपण अनेक वस्तूंचा उपयोग करतो यामध्ये आवळा शिकाकाई रिटा अशा घटकांचा समावेश असतो. परंतु याशिवाय सुद्धा किचनमध्येच असलेले अनेक घटक आपण मेहंदी मध्ये वापरतो. परंतु हे घटक वापरताना आपण हे पाहिले पाहिजे की त्याचा आपल्याला खरोखरच फायदा होतो की नाही.

अनेक वेळा मेहंदी मध्ये अनावश्यक घटक मिक्स केल्यामुळे आपले केस खराब होतात. मेहंदीचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा आपण त्यामध्ये आवश्यक ते घटक वापरले तर. अनेक लोकांना मेहंदी कशा पद्धतीने लावायचे याची सुद्धा माहिती नसते. त्यामुळे मेहंदीचा चांगला परिणाम केसावऱ दिसून येत नाही. जर तुम्ही पुढील काही चुका करत असाल तर त्या बंद करा कारण यामुळे केसांची सुंदरता वाढण्याऐवजी खराब होऊन जाते.

तुम्ही मेहंदी भिजवल्यानंतर जर केसांना लगेच लावत असाल तर ती खूप चुकीची गोष्ट आहे. यामुळे मेंदीचा रंग केसावर चढणार नाही आणि त्यात असणारे आवश्यक पोषक घटक ही केसांना मिळणार नाहीत. यासाठी मेहंदी नेहमीच दहा ते बारा तास भिजवून ठेवावी लागते. तुम्हाला वाटले तर तुम्ही रात्रभर भिजवून ठेवून सकाळी तुमच्या केसांना लावू शकता.

मेहंदी मध्ये या दोन गोष्टीचा अजिबात वापर करू नका...

मेंदी भिजवताना तुम्ही जर त्यामध्ये दही सारखे घटक मिक्स करत असाल तर ते त्वरित बंद करा. कारण अंडी आणि दही मेहंदी मध्ये असलेल्या प्रोटीन बरोबर बॉण्डिंग होते. यामुळे केसांना आवश्यक असणारे प्रोटीन मिळत नाही. त्यासाठी तुम्ही मेहंदी मध्ये अंडी अथवा दही मिक्स करून नका. जर तुम्ही अंड्याचा पांढरा हिस्सा बाजूला करून मेहंदीत मिसळत असाल तर ती पद्धत सुद्धा वापरू नका.

मेहंदी लावण्यापूर्वी केसांना तेल लावू नका...

डोक्याला मेहंदी लावणार असाल तर तेल वापरू नका. जर तुम्हाला आवश्यक असेल तर केसांच्या मुळांना फक्त ते लावा तेही एक दिवस आगोदर. जर तुमचे केस ड्राय नसतील तर मेंदी लावण्याच्या पहिला तेल वापरू नका. तेल लावल्यामुळे केसांच्या वर एक तेलाचा थर बनतो त्यामुळे मेहंदीचा रंग त्यावर चढत नाही. तुम्हाला वाटत असेल की मेहंदी मुळे केसांना रंग चांगला यावा तर तेल लावू नका.

साध्या पाण्यामध्ये मेहंदी भिजवू नका...

केसांना मेहंदीचा चांगला रंग यावा असे वाटत असेल तर साध्या पाण्यात ते कधीही भिजवू नका. तुम्हाला वाटले तर ते कॉफी अथवा चहा पत्ती च्या पाण्यात मिक्स करून त्यामध्ये भिजवू शकता. यामुळे केसांचा रंग चांगला गडद होतो. तुम्ही हे पाणी गार करू मग त्यानंतर मेहंदी साठी वापरू शकता.

लिंबाच्या रसाचा वापर करू नका...

मेंदी भिजवत असताना त्यामध्ये लिंबूचे रस अजिबात वापरू नका. कारण हा घटक आपल्या केसांना ड्राय बनवतो. लिंबूच्या रसामध्ये सिट्रिक एसिड असते. ज्याच्या वापर केसांमध्ये करू नये. केसातील कोंडा कमी करण्यासाठी लिंबू चा वापर अनेक वेळा होतो. परंतु यामुळे केस खूप कोरडे होतात आणि केसाची नुकसानही होते त्यामुळे याचा वापर मेहंदी मध्ये करू नका.