esakal | ..तरी खचला नाही आत्मविश्वास; २३ वर्षीय मॉडेलचा थक्क करणारा प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

खचला नाही आत्मविश्वास; २३ वर्षीय मॉडेलचा थक्क करणारा प्रवास

खचला नाही आत्मविश्वास; २३ वर्षीय मॉडेलचा थक्क करणारा प्रवास

sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या काही काळापासून सौंदर्याची संकल्पना बदलली आहे. कोणेएके काळी बाह्यरुपावरुन सौंदर्याची परिभाषा केली जात होती. मात्र, आता सौंदर्य हे बाह्यरुपावर अवलंबून नसून माणसाच्या मनावर, बुद्धेमत्तेवर अवलंबून असतं हे हळूहळू जगाला पटू लागलं आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील महोगनी गेटर या मॉडेलची चर्चा रंगली आहे. आपल्या असाध्य आजारावर मात करत आज ती यशस्वी मॉडेल (model) म्हणून जगासमोर वावरत आहे. अनेकांना तिचा हेवा वाटतो. तर, अनेकजण अजूनही तिच्यावर टीका करतात. परंतु, या सगळ्यांना झुगारुन तिने तिची वेगळी वाट निवडली आहे आणि त्या वाटेवर ती मार्गस्थदेखील झाली आहे. (model-suffering-from-lymphedema-made-its-weakness-its-biggest-strength)

महोगनी गेटरने तिचं व्यंग लपवण्यापेक्षा त्यासोबत जगण्याची आणि त्या व्यंगालाच करिअर म्हणून कलाटणी दिली. आपलं व्यंग झाकून टाकण्यापेक्षा ती त्याच्यासोबत वावरते, फोटोशूट करते. विशेष म्हणजे व्यंगाचा कलात्मकतेने कसा वापर करायचा हे महोगनीने जगाला दाखवून दिलं आहे.

हेही वाचा: कमाल! फक्त एका प्रवाशासाठी घेतलं विमानाने उड्डाण

२३ वर्षीय महोगनी ही लिम्फेडेमा (lymphedema) नावाच्या आजाराने त्रस्त आहे. लिम्फेटिक सिस्टीम ही एक ब्लॉकेजमुळे निर्माण होणारी समस्या आहे. या आजारात शरीरातील एका ठराविक भागाला कायम सूज येते आणि त्यावर कोणताही उपाय नाही. महेगनीच्या डाव्या पायाला ही सूज असून तिच्या पायाचं वजन तब्बल ४५ किलो आहे.

"शारीरिक त्रासापेक्षा मला मानसिक त्रासाला जास्त सामोरं जावं लागतं. अनेकदा मला टीकाही सहन करावी लागते. परंतु, हे माझं व्यंग नसून हीच माझी ताकद आहे, असं मी मनाला समाजवते", असं महोगनी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "अनेकांनी मला पाय कापण्याचा सल्ला दिला. पण, मी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करते या व्यंगामुळेच मला जगण्याची ताकद मिळाली आहे. हे व्यंग लपवण्यापेक्षा या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल याकडे मी लक्ष दिलं. त्यानुसार, मी लिम्फेडेमाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली."