

A healthy Monsoon Diet with seasonal vegetables and immunity-boosting foods helps improve digestion and prevent seasonal infections.
Sakal
वैष्णवी ठिगळे
पावसाळ्यात खाण्यासाठीची काही फळे आपण गेल्या आठवड्यात बघितली. आता काही भाज्यांबद्दल माहिती घेऊ.
दोडका : फायदे : सहज पचणारी भाजी. शरीरातील उष्णता कमी करते, यकृताचे कार्य सुधारते, वजन कमी करण्यास मदत.
घोसाळे : फायदे : पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी करते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते
तोंडली : फायदे : रक्तातील साखर नियंत्रणास मदत. फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.
भेंडी : पोषकतत्त्वे : विद्रव्य फायबर, व्हिटॅमिन K, फोलेट.