Morning Routine : सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी काय खावं अन् प्यावं? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

जगातील अनेक लोक सकाळी उठल्यावर चहा-कॉफीच पितात
Morning Routine
Morning Routineesakal

Morning Routine :

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पहिल्यांदा काहीतरी प्यावे की खावे हे बहुतेकांना माहीत नसते. काही लोकांना झोपेतून उठल्याबरोबर चहा घेतात. परंतु रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीमुळे पोटातील ऍसिड वाढू शकते. कारण सकाळी पोटात ॲसिडचे प्रमाण अधिक असते आणि चहा-कॉफीमुळे ॲसिडचे प्रमाण आणखी वाढते.

मग रिकामे पोट भरायला सुरुवात कुठून करायची? फोर्टिस हॉस्पिटल, फरिदाबादचे मुख्य आहारतज्ञ डॉ. किरण दलाल सांगतात की, आपण सकाळी उठल्याबरोबर नक्कीच पाणी प्यायला हवे. जर पाणी कोमट असेल तर ते अधिक चांगले आहे.

Morning Routine
Health Care news : तुम्हालाही अन्न पचनाचा त्रास्त होतोय? मग 'या' सवयी आजच सोडा..

प्रथम - कोमट पाणी

किरण दलाल यांनी सांगितले की, आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता असल्यास शरीरात अनेक रसायनांची प्रतिक्रिया होत नाही. जेव्हा आपण रात्रभर झोपतो तेव्हा पोटात असलेले पाणी शरीरातील विविध प्रक्रियांमध्ये प्रथम वापरले जाते.

सकाळी उठल्यानंतर शरीरात पाण्याची तीव्र कमतरता जाणवते. त्यामुळे सकाळी सर्वात आधी पाणी पिणे गरजेचे आहे. हे शरीराला निर्जलीकरण होण्यापासून वाचवेल. दुसरे म्हणजे, सकाळी पोटात ॲसिडचे प्रमाण जास्त असते.

आपण पाणी प्यायलो तर आम्ल पातळ होईल. त्यामुळे गॅस किंवा आम्ल कमी प्रमाणात तयार होईल. दिवसभर शरीरात होणाऱ्या विविध प्रक्रियांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही.

Morning Routine
Health Care News : बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी ही पाने चावा, लवकरच मिळेल आराम

त्यांनी सांगितले की पाणी शरीरात नैसर्गिक शुद्धीकरणाचे काम करते. त्यामुळे आतड्यातील सर्व घाण काढून टाकण्यास पाणी मदत करेल. सकाळी जास्त पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होऊ शकते.

Morning Routine
Health Care: सावधान! आपत्कालीन गोळीने हार्मोन्समध्ये वेगाने बदल; Pills गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य नसल्याचा डॉक्टरांचा दावा

उपाशीपोटी काय खावं?

पाणी प्यायल्यानंतर आधी काय खावे. हा देखील मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत, हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, पाणी प्यायल्यानंतर तुम्ही अनेक हलक्या गोष्टी खाऊ शकता. फक्त हे लक्षात ठेवा की सकाळी ॲसिड वाढवणाऱ्या किंवा गॅस वाढवणाऱ्या अशा गोष्टी जास्त प्रमाणात खाऊ नका.

डॉक्टरांनी सांगितले की सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही आधी थोडे मोड आलेले धान्य खा. म्हणजे अंकुरलेले हरभरे, सीड्स, मूग, मटकी, इ. जर तुम्हाला यासोबत जास्त खायचे असेल तर तुम्ही त्यात काही फळांचा समावेश करू शकता.

Morning Routine
Health Care News : वेलची आणि दूध आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, 'या' आजारांपासून मिळेल सुटका..

सफरचंद आणि केळी हे यासाठी सर्वोत्तम पर्याय असतील कारण यातून कोणताही वायू किंवा आम्ल तयार होणार नाही. यासोबत तुम्ही ओट्स, बेरी, अंडी, चिया सीड्स, होल ग्रेन टोस्ट, टरबूज इत्यादी देखील खाऊ शकता. तसेच रात्री भिजत घातलेले बदाम आणि अक्रोड खाऊनही तूम्ही दिवसाची सुरूवात करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com