Morning Walk पाळी सुरू असताना करावा का? जाणून घ्या कारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Morning Walk पाळी सुरू असताना करावा का? जाणून घ्या कारणे
Morning Walk पाळी सुरू असताना करावा का? जाणून घ्या कारणे

Morning Walk पाळी सुरू असताना करावा का? जाणून घ्या कारणे

sakal_logo
By
भक्ती सोमण-गोखले

पाळी सुरू झाल्यावर महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. स्त्राव भरपूर जातो. त्यामुळे कंबरदुखी, पोट, पाय दुखणे या समस्या असतातच. तसेच थकवाही खूप येतो. काही महिला फिटनेसविषयी अतिशय जागरूक असतात. पाळीचा त्रास होत असला तरी त्या चालण्याचा किंवा धावायला जाण्याचा विचार करतात. पण असं करणं योग्य आहे का ते जाणून घेऊया.

हेही वाचा: पुन्हा लग्न करण्यासाठी साईट्सची मदत घेताय? या टिप्स फॉलो करा

Periods

Periods

शारीरिकदृष्ट्या एक्टीव राहणे चांगले- मासिक पाळीच्या काळात महिलांनी शारिरिकदृष्ट्या सक्रिय असले पाहिजे असे तज्ज्ञ सांगतात. काही महिलांना पाळीचा खूप त्रास होतो. अशावेळी त्या आराम करणे पसंत करतात. मात्र काही स्त्रिया हलका व्यायाम, योगा किंवा वर्कआऊट करायला प्राधान्य देतात. असे केल्यानेही मासिक पाळीत आराम मिळू शकतो. म्हणूनच या काळात हलका वर्कआऊट करणे अधिक चांगले.

धावणे योग्य कि अयोग्य- या काळात तुम्ही धावूही शकता. एका अभ्यासानुसार मासिक पाळीच्या काळात 30 मिनिटे वर्कआऊट करणे चांगले असे म्हटले आहे. यामुळे पोट, कंबर, पाय आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. धावल्यामुळे रक्ताभिसरण वाढते. तसेच शरीराच्या स्नायूंना आराम मिळतो. त्यामुळे वेदना कमी होण्यासही मदत होते. पण धावत असाल तेव्हा ज्यूस, पाणी अवश्य प्या.

ट्रेडमिलवर व्यायाम करा- पाळी चालू असली तरी ट्रेडमिलवरही धावता येते, याशिवाय सुरुवातीच्या दिवसांत जॉगिंग, योगा, लाइट कार्डिओ, ब्रिस्क वॉक आणि स्विमिंगही करता येते.

अशी घ्या काळजी

- पाळी चालू असताना शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. यासाठी भरपूर पाणी प्या. तसेच ज्यूस, नारळपाणी पिण्यास प्राधान्य द्या.
- सतत धावणे टाळा आणि मध्ये ब्रेक घेत रहा.
- मासिक पाळी दरम्यान हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये आदी पौष्टिक पदार्थ खा

loading image
go to top