पुन्हा लग्न करण्यासाठी साईट्सची मदत घेताय? या टिप्स फॉलो करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुन्हा लग्न करण्यासाठी साईट्सची मदत घेताय? या टिप्स फॉलो करा
पुन्हा लग्न करण्यासाठी साईट्सची मदत घेताय? या टिप्स फॉलो करा

पुन्हा लग्न करण्यासाठी साईट्सची मदत घेताय? या टिप्स फॉलो करा

sakal_logo
By
भक्ती सोमण-गोखले

पहिल्या लग्नावेळी काही अडचणी येऊन घटस्फोट झाल्यास किंवा पार्टनरचे निधन झाले तर काही काळाने लोकं दुसऱया लग्नाचा विचार करतात. हा निर्णय घेणे तसे खूप अवघड असते. पण पार्टरनकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत याविषयी जर आपण ठाम असलो तर नक्कीच दुसऱ्या लग्नासाठी तुम्ही तयार आहात असे समजावे.

एकदा लग्नाला तयार झालात की अगदी जवळच्या लोकांना याविषयी सांगावे. पण आता टिंडर, बंबल, हिंज (Hinge), ओके क्युपीड OkCupid अशा काही अनेक डेटींग अॅप्स आणि मेट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून तुम्ही पार्टरनचा शोध घेऊ शकता.

हेही वाचा: पुन्हा लग्न करावं का? दुसऱ्या लग्नापूर्वी या 8 गोष्टी लक्षात ठेवा

अशी करा पूर्वतयारी

पुन्हा लग्न करायचा विचार करताना जो विचार तुम्ही काहीतरी विचार नक्की केला असेल.जेव्हा अशा साईट्सवर तुम्ही तुमची माहिती लिहाल तेव्हा त्या विचारांशी अनुरूप पर्याय निवडून आपले प्रोफाईल तयार करा. तुम्ही जर पार्टरनचे मुल स्विकार करण्यास तयार असाल तर तसे स्पष्ट मेंशन करा. तसेच तुमच्या अपेक्षाही स्पष्टपणे मांडा. म्हणजे तुमच्या अपेक्षांशी मिळते जुळते प्रोफाईल निवडणे तुम्हाला सोपे होईल.

हेही वाचा: नवरा असावा तर अस्सा... मुली शोधतात अशा प्रकारचा पार्टनर

या गोष्टी लक्षात राहू द्या

-तुम्ही साईटवर पैसे भरलेत की समोरच्या व्यक्तीशी तुम्हाला चॅट वा थेट संपर्क साधायचा असेल तर पैसे भरावे लागतात. साधारणपणे 3 महिन्याच्या पॅकेजने सुरूवात होते. त्याचा दर 3 ते 4 हजार रूपये असतो.

- तुम्ही तुमचा बायोडेटा, फोटो टाकून प्रोफाईल तयार केलेत की काही दिवस भरपूर इंटरेस्ट येतात. त्यामुळे हरखून जाऊ नका. प्रत्येक बायोडेटा वाचून किंवा बेसिक वाचून त्या व्यक्तीचा इंटरेस्ट स्विकारायचा की नाही हे ठरवा.

- इंटरेस्ट स्विकारलात की लगेच समोरची व्यक्ती संपर्क करेल असे नाही. जर त्या व्यक्तीचा संपर्क मिळाला तर तुम्ही त्या व्यक्तीला संपर्क करा. पण त्याआधी थोडी वाट पाहा.

-समोरच्या व्यक्तीने साईटवरील चॅटच्या माध्यमातून संपर्क केल्यावर तिथेच जुजबी बोलत राहून 4-5 दिवस त्या व्यक्तीशी बोलत राहा. ती व्यक्ती बोलताना चांगली वाटतेय असे वाटत असेल तरच तुमचा नंबर द्या. काहीजण खूप अघळपघळ बोलतात किंवा चढवून आपली माहिती सांगतात. त्यामुळे व्यक्ती जी माहिती देत आहे त्याची खातरजमा तुम्ही फेसबुक किंवा इतर माध्यमातून करू शकता.

-साईटवर चॅटींगवेळी तुम्हाला समोरच्याकडून पाळी पाळणार का? मुलाची जबाबदारी घेणार नाही. पालकांची जबाबदारी आहे का? फिजिकल गरजांविषयी बोलायला सुरूवात केली जाऊ शकते. अशा व्यक्तींशी कसे डिल करायचे हे तुम्ही ठरवा.

-तुमचा नंबर बघून समोरच्या व्यक्तीने थेट तुमच्या नंबरवर कॉल केला किंवा व्हॉटसअपवर बोलायला सुरूवात केली तर एक्साईट न होता शांतपणे जुजबी संभाषण करा. त्याच्या बोलण्यातून तो तुम्हाला सतत बोलण्यासाठी पाठी लागत असेल आणि त्यामुळे जर तुम्हाला इरिटेट होत असेल तर तसे स्पष्ट सांगा. असे सांगितल्यावर त्या व्यक्तीने काही उलटसूलट बोलण्यास सुरूवात केली तर सरळ इंटरेस्ट नाही असे सांगा,

- काही प्रोफाईल्समध्ये फक्त डिवोर्स असे लिहिलेले असते. पण ती व्यक्ती तुमच्याशी चॅट करत असेल तर बोलण्यातून तीचा दोनदा डिवोर्स झाल्याचे समजते. अशावेळी त्या व्यक्तीशी संवाद सुरू ठेवायचा कि नाही हे तुम्हीच ठरवा.

-मॅट्रोमोनियल साईटवरून ओळख होऊन चॅटवर बोलून ती व्यक्ती चांगली वाटत असली तरी प्रत्यक्ष भेटीने खूप फरक पडतो. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीवर भर द्या. पण भेटायला जाताना निर्जनस्थळी भेटायला अजिबात जाऊ नका. सार्वजनिक ठिकाणी भेटण्यावर भर द्या.

loading image
go to top