Mosquito liquid Side Effects : डासांना पळवून लावणारी लिक्विड मशीन आरोग्यासाठी ठरतेय धोकादायक, काळजी घ्या नाहीतर...

नवजात शिशूला तर यापासून दूरच ठेवा
Mosquito liquid Side Effects
Mosquito liquid Side Effects esakal

Mosquito liquid Side Effects :

डासांपासून पसरणाऱ्या गंभीर आजारांमुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागत आहे. डेंग्यू, मलेरिया यासारख्या रूग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळेच जगजागृती करून आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यास सांगितले जात आहे. लोकांनीही वैयक्तिक पातळीवर डासांची अगरबत्ती, कॉईल आणि लिक्विड वापरण्यास सुरूवात केली आहे.

डासांना पळवून लावण्यासाठी लिक्विडचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. कारण, लिक्विडचा वापर आपण २४ तास करत आहोत. त्यामुळे, त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. डासांच्या या लिक्विडमुळे लहान मुले, तरूण आणि वृद्धांनाही याचा त्रास होत आहे. त्याबद्दलच अधिक जाणून घेऊयात. 

Mosquito liquid Side Effects
Dengue mosquito : डेंगी वाहक डासांच्या अंड्यांचे गूूढ उकलले

दम्याचा त्रास

डासांना घरात फिरकण्याच मज्जाव आणणारे लिक्विडचे मशीन तुम्हाला दम्याचा आजार घेऊन येऊ शकते. केमिकल मशीन आणि कॉइलमधून निघणाऱ्या धुरामुळे दम्याचा त्रास सुरू होऊ शखतो. या मशीनमुळे घरातील हवा अशुद्ध होते. याचा वास उग्र असतो जो आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी यापासून दूर रहावे.

त्वचा आणि डोळे

लिक्विडमध्ये असलेले केमिकल तुमच्या त्वचेवरही वाईट परिणाम करते. या लिक्विडच्या वासाच्या संपर्कात आल्यास त्वचेवर खाज सुटू शकते. तसेच, त्यामुळे डोळ्यांनाही इजा होऊ शकते. त्यामुळे हे लिक्विड कमी प्रमाणात वापरण्याचा प्रयत्न करा. किंवा डासांसाठी इतर काही चांगले पर्याय करता येतात का हे पहा.  

डोकेदुखी आणि उलट्या

काही लोक रात्री सुरू केलेलं लिक्विड दिवसभर सुरू ठेवतात. त्यामुळे त्याची दुर्गंधी घरभर पसरते. त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे आणि उलट्या होऊ शकतात. झोपण्यापूर्वी लिक्विड डिस्पेंसर बंद करा. त्यामुळे डासही पळून जातील आणि त्यांचे आरोग्यही बिघडण्यापासून वाचेल.

Mosquito liquid Side Effects
Mosquito Control Tips : अगरबत्ती, मॉर्टीननेही डास कमी होईनात? ; हा स्वस्त न् मस्त उपाय करेल मदत!

नवजात शिशूला धोका

लहान मुले, नवजात शिशू यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये, घरात हे लिक्विड हमखास वापरले जाते. पण, मुलांची नाजूक त्वचा आणि हृदयाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी हे लिक्विड त्यांच्या जवळपास लावू नका. नवजात शिशूला तर यापासून दूरच ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com