Mosquitoes Bite: डास चावल्यामुळे येते खाज आणि त्वचेवर होते जळजळ ? करून बघा हे घरगुती उपाय

डास चावल्यानंतर सुरूवातीला 3 ते 15 मिनिटे तुम्हाला जळजळ जाणवू शकते.
mosquitoes
mosquitoes esakal

डासांचा (Mosquitoes) धोका पुन्हा एकदा वाढला आहे. हे डासांचे चक्र दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून हिवाळ्यापर्यत सुरू राहते. काहीवेळा डास अचानक वाढतात, नंतर हवामानातील बदलामुळे ते अचानक गायब देखील होतात. डास चावल्याने त्रास होतोच पण सर्वात त्रासदायक म्हणजे डास चावल्यानंतर होणारी त्वचेवरची जळजळ.

डास चावल्यानंतर सुरूवातीला 3 ते 15 मिनिटे तुम्हाला जळजळ जाणवू शकते. यामुळे मन पूर्णपणे अस्वस्थ होते. सर्व लक्ष डास चावण्याच्या ठिकाणी येणारी खाज आणि होणारी जळजळ यावर केंद्रित होते. त्यामुळे मग कोणत्याही कामात माणसांच लक्ष लागत नाही.

आज आपण या लेखात डास चावल्यानंतर त्या ठिकाणी येणारी खाज आणि होणारी जळजळ यापासून बचाव करण्यासाठीचे काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

mosquitoes
Health Tips : सालीसकट बदाम चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

● डास चावलेल्या ठिकाणी लगेच बर्फ लावणे हा उत्तम उपाय आहे.

● डास चावल्यानंतर घरात असलेला मधाचा एक थेंब घेऊन त्या जागेवर हलके चोळल्यास होणारी जळजळ आणि येणारी खाज कमी होते.

● घरात असलेले एलोवेरा जेल तुम्ही डास चावण्याच्या ठिकाणीही लावू शकता.

● स्वयंपाक घरात असलेले लिंबू देखील डास चावल्यावर होणारी जळजळ लगेच शांत करण्यासाठी महत्त्वाचे काम करते.

● टूथपेस्टमध्येही असे अनेक घटक असतात. जे ही घास आणि होणारी जळजळ लगेच शांत करण्याचे काम करतात. त्यामुळे डास चावल्यावर तुम्ही टूथपेस्टही लावू शकता.

mosquitoes
Health Tips : Heart Attack टाळायचाय? रोजच्या जेवणात 'ही' डाळ अवश्य ठेवा

● डास चावल्यानंतर घरात असलेला बेकिंग सोडा चिमूटभर घ्यावा आणि तो एक ते दोन थेंब पाण्यात विरघळवून त्यांची पेस्ट तयार करून ती डास चावलेल्या ठिकाणी लावावी. त्यामुळे जळजळ आणि खाज लगेच कमी होते.

● जर तुम्ही ट्रेकिंग,टूर किंवा बाहेरगावी असाल आणि तुमच्याकडे यापैकी कोणतीही गोष्ट उपलब्ध नसेल, तर तुम्ही पिण्याच्या पाण्याचा वापर करून डास चावण्यापासून होणारा त्रास टाळू शकता. त्या जागेवर थोडे पाणी टाका. खाज पूर्णपणे बरी होणार नाही पण तुम्हाला खूप आराम मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com