कोरोनाविरुध्दच्या लढ्यासाठी आईचं दूध बाळासाठी ठरतंय 'सुरक्षा कवच'

Mother Milk
Mother Milkesakal

Corona Virus : कोरोना महामारी टाळण्यासाठी अनेक देश आपल्या नागरिकांना जास्तीत-जास्त लसी देण्याचा प्रयत्न करताहेत, तर अनेक देशांनी 12 ते 17 वर्षांच्या मुलांना लसीकरणाची परवानगी दिलीय. परंतु, आईचं दूध पिणाऱ्या मुलांसाठी 'संरक्षणात्मक' कोणतीही अद्याप तरतूद केली गेली नाही. अशा परिस्थितीत, जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञांसमोर हे आव्हान होतं, की लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी काय करावं? काही महिन्यांपूर्वी गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना लस घेण्याची परवानगी दिली गेली नव्हती, पण नंतर त्यांनाही ही परवानगी दिली गेली.

Summary

कोरोना महामारी टाळण्यासाठी अनेक देश आपल्या नागरिकांना जास्तीत-जास्त लसी देण्याचा प्रयत्न करताहेत.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे, की ज्या स्त्रियांनी स्तनपान केले आणि त्यांनी लस घेतली, त्यानंतर त्यांचं दूध देखील कोरोनाविरूद्ध 'अॅन्टीबॉडी' बनवते. हे संशोधन 'ब्रेस्टफीडिंग मेडिसिन' (Breastfeeding Medicine) या जर्नलमध्ये प्रकाशित झालंय. यासह असा सल्ला देण्यात आला आहे, की ज्या मातांनी लस घेतली आहे ते आपल्या मुलाला अॅन्टीबॉडीज् देऊ शकतात.

संशोधकांनी म्हटलं आहे, की जेव्हा बाळ जन्माला येतं, तेव्हा त्यांची प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या प्रक्रियेत असते. फ्लोरिडा विद्यापीठाचे (Florida University) सहाय्यक प्राध्यापक जोसेफ लार्किन यांच्या म्हणण्यानुसार, लसीकरण आईच्या दुधात SARS-CoV-2 विरूद्ध 'अॅन्टीबॉडी' तयार करते, असे सांगण्यात आलंय.

Mother Milk
जाणून घ्या, घरी लावलेल्या आरशाचे वास्तु कनेक्शन...
Mother Milk
Mother Milk

तर जेव्हा मुलं जन्माला येतात, तेव्हा त्यांची रोगप्रतिकारक (Immune System) शक्ती अविकसित असते, ज्यामुळे त्यांना स्वतःच संक्रमणाशी लढणं कठीण होतं. काही प्रकारच्या लसींना पुरेसा प्रतिसाद देण्यासाठी ते बऱ्याचदा लहान असतात. त्यामुळे या संवेदनशील काळात, स्तनपान करणाऱ्या मातांना बाळाला 'अॅन्टीबॉडी' प्रदान करण्याची परवानगी आहे, असंही संशोधकांनी स्पष्ट केलंय.

प्रतिकारशक्तीसाठी आईचं दूध आवश्यक

या अभ्यासाचे लेखक जोसेफ नू म्हणाले, की त्यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गाशी लढणं कठीण वाटतं. आईच्या दुधामुळे मुलांना विकासाच्या या महत्त्वाच्या वेळी उत्तम प्रतिकारशक्ती मिळते. आईचं दूध हे एका टूलबॉक्ससारखं आहे, जे नवजात बाळाला जीवनासाठी आवश्यक असलेली विविध साधनं देण्यास मदत करतं. लस घेतल्यानंतर, या टूलबॉक्समध्ये आणखी एक महत्त्वाचं साधन जोडलं जातं. जे कोविडपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.

Mother Milk
दुध आवडत नाही? या पदार्थांमधून मिळेल भरपूर कॅल्शिअम

डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान केलेल्या या संशोधनात संशोधकांनी 21 स्तनपान करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश केला. ज्यांना कोरोनाची कधीच लागण झाली नव्हती. संशोधनानुसार, लस देण्यापूर्वी त्यांच्या आईच्या दुधाचे आणि रक्ताचे नमुने तीन वेळा तपासण्यात आले. संशोधनात असं म्हटलं आहे, की महिलांना कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिल्यानंतर असं दिसून आलं, की त्यांच्या रक्तात आणि अगदी आईच्या दुधातही अॅन्टीबॉडीज विकसित झाल्या आहेत आणि या अॅन्टीबॉडीज लसीपूर्वी घेतलेल्या नमुन्यांपेक्षा कित्येक पटीनं जास्त आहेत. या व्यतिरिक्त, लस घेतलेल्या, कोरोनाची लागण झालेल्या आणि बरे झालेल्या अशा मातांच्या दुधातही अॅन्टीबॉडीजची पातळी जास्त होती, असंही संशोधनात नमूद केलं गेलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com