Mother's Day 2024 : 'ती' श्वासही देते, ध्यासशी देते ,जगण्याचा विश्वास ही देते

Mother : कित्येक मुलांच्या लढवय्या 'आया' दत्तक विधान संस्थेतही राहतात
मातृत्व दिन : आईसाठीचा खास दिवस
मातृत्व दिन : आईसाठीचा खास दिवस esakal

Mother's Day : 'आई' जगातला सर्वात सुंदर शब्द. आई हे फक्त नाते नाही तर ती संपूर्ण कुटुंबाचा आधार असते. जग एकीकडे आणि आई एकीकडे. म्हणूनच बाळाला सर्वात सुरक्षित वाटते ती आईची 'कुशी'. दुर्दैवाने काही बाळांना हे सुख मिळत नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत ही बाळ दत्तकविधान संस्थेत आणली जातात. या बाळांशी रक्ताचे नाते नसले तरीही दुसऱ्यांच्या या बाळालाही जपणार्या आया सुद्धा आईपेक्षा कमी नाही. खरेतर या बाळासांठी हीच आया हीच आई.

मातृत्व दिन : आईसाठीचा खास दिवस
Mother's Day 2024 : एकट्याच राहणाऱ्या आईला या गोष्टींत रमायला शिकवा, तिचा वेळ चांगला जाईल!

दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात ‘मातृदिन’ म्हणजेच ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. संपूर्ण जगातच आईच्या त्यागाच्या असंख्य कहाण्या सांगितल्या जातात. परिस्थिती कशीही असो, आईसारखी लढवय्यी कुठेही नाही. अशीच एक आई दत्तकविधान संस्थेतही राहते. परित्यागित बालके, सोडून दिलेली बालके, कुमारी मातेची बालके ० ते ६ वयोगटातील बाळ

बालकल्याण समितीमार्फत दत्तकविधान संस्थेत येतात. या बाळांची आई म्हणजे इथल्या आया. खरेतर त्यांना कुणीही आया असे संबोधतही नाही. मुल त्यांना 'आईच' म्हणतात. बालकल्याण समितीव्यतिरिक्त कधी स्वयंसेवी संस्था, पोलिसांमार्फत ती सेंटरमध्ये दाखल होतात.

बाळांची दत्तकविधान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती सेंटरला राहत असल्याने आया याच त्यांची आई आणि बाबा. टाकून दिलेले बाळ हे वास्तव भयानक असले तरीही अशा घटना समाजात नेहमीच घडतात. परिस्थितीला कंटाळून पालकांनी या बाळांना नाकारले तरीही सेंटर त्यांचा स्वीकार करते.

बरेचदा ही बाळ जखमी अवस्थेत, गंभीर परिस्थितीत सापडतात. बाळाची प्रकृती ठीक नसते. अनेकदा बाळांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते. त्यांना जास्त काळजीची गरज असते. बाळाची तब्येत चांगली होईपर्यंत ही संपूर्ण जबाबदारी आयांवर येते. योग्य पालकांच्या स्वाधीन होईपर्यंतचा दुवा ठरतात या आयाच अगदी आपल्या सख्ख्या मुलांप्रमाणेच याही बाळाची काळथी घेतात. त्यांची संपूर्ण दैनंदिनी, त्यांच्या सवयी, आवडीनिवडी हे सगळे बघण्याच काम या आईच करतात.

मातृत्व दिन : आईसाठीचा खास दिवस
Mother's Day 2024 : ..गोष्ट पाळणाघरात रमलेल्या आईची! मुलीच्या संगोपणासाठी 'तिने' दिला नोकरीचा राजीनामा

बालसंगोपनाचे विशेष प्रशिक्षण असल्याने मुलांशी त्यांचे भावनिक नाते तयार होते. एक ना एक दिवस ते मूल पालकांकडे जाईल हे माहिती असूनही आई त्यांना सांभाळतात. शहरात एन -४ येथे भारतीय समाज सेवा केंद्र ( बीएसएसके) आणि ज्योतीनगर येथे साकार संस्था या दत्तकविधान संस्थेतील आया ही जबाबदारी अत्यंत उत्तमपणे निभावतात.

लॉकडाऊनमध्ये संस्थेतील बाळांना करोना होण्यापासून सुरक्षित ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. दोन्ही संस्थांतील आईंनी ड्युटीवर येण्यास टाळाटाळ न करता ही मोठ्या हिंमतीने काम केले. बीएसएसकेमध्ये सध्या

११ बाळ असून १५ आया त्यांची काळजी घेतात. तर साकारमध्ये १७ बाळ असून २१ आया आहेत. आयांची ड्युटी रोटेशनमध्ये असल्या तरीही २४ तास काम चालते. बाळांची तब्येत बरी नसते. अशावेळी बाळाला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले तर तेव्हा त्या बाळाची जबाबदारी असलेल्या आईला तिथेच रहावे लागले. हेच कारण आहे की ती मुलही आईला विसरत नाही.

आईपण जपलेल्या या आयांची ही निष्ठा खरोखरच विलक्षण आहे.

एक विशेष घटना :

बीएसएसकेमध्ये दाखल झालेल्या बाळाचे वजन अवघे १२०० ग्रँम होते. अवघ्या १२ दिवसांच्या या बाळाची काळजी इथल्या आयांनी घेतली. त्याच्या आहाराची बाळाची खूप छान काळजी घेतली. आता या बाळाचे वजन वाढले. संस्थेतील साडेपाच वर्षांचा मुलगा विशेष मूल असल्याने (सीपी) त्याला बरेचदा उचलून न्यावे लागते. संस्थेने प्रयत्न केले आणि तिथल्या आईने प्रयत्नपूर्वक त्याची काळजी घेतली. तो मुलगा सामान्य शाळेत शिकायला जातो आणि त्या आई त्याची खूप छान काळजी घेतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com