mumbai : वेब-लाईफस्टाईलसाठी मारुतीची आगामी ईव्ही दहा लाख रुपयांपुढेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maruti suzuki

mumbai : वेब-लाईफस्टाईलसाठी मारुतीची आगामी ईव्ही दहा लाख रुपयांपुढेच

मुंबई :मारुती सुझुकी इंडिया आपल्या आगामी इलेक्ट्रिक मोटारीच्या निर्मितीसाठी बॅटरी च्या किमती कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या असल्या तरी देखील मारुतीच्या इलेक्ट्रिक मोटार ची किंमत दहा लाखांपेक्षा कमी राहणार नाही, अशी माहिती मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी आज नवी दिल्ली येथे दिली. कंपनीच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते.

स्वस्त इलेक्ट्रिक मोटार बनवण्याच्या प्रयत्नात मारुती असून साडेसात लाख ते दहा लाख रुपयांच्या दरम्यान तिची किंमत असेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र या मोटारीची किंमत दहा लाख रुपयांपेक्षा कमी असणार नाही, असे सांगून अध्यक्षांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. मारुतीची इलेक्ट्रिक मोटार २०२५ च्या आसपास बाजारात येण्याची शक्यता आहे.

दरवर्षी चार ते साडेचार लाख सीएनजी मोटारीही तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ही संख्या आणखीन वाढवायची आहे, मात्र सीएनजी मोटारीच्या काही सुट्ट्या भागांची टंचाई असल्यामुळे सध्या परिस्थिती कठीण आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र त्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे सध्या सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे तसेच मोटारींची विक्रीही वाढल्यामुळे कंपनीसाठी आशादायक चित्र असल्याचे भार्गव म्हणाले.

सन २०१९-२० पासून मारुतीची विक्री घटण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारच्या प्रदूषण विषयक नियमांच्या अंमलबजावणीमुळे किमती वाढल्याने विक्री घटली. त्यानंतर दोन वर्षे कोविडचा फटका बसला, त्यानंतर सेमीकंडक्टरचा तुटवडा आला. मात्र आता या सर्व चिंता संपल्या आहेत. आता यावर्षी वीस लाख मोटारींचे उत्पादन केले जाईल. तर सुझुकीच्या जागतिक उत्पादनात मारुती सुझुकी इंडियाचा वाटा ६० टक्क्यांच्या आसपास राहील, असेही भार्गव यांनी सांगितले.

गुजरात मधील सुझुकीच्या कारखान्यात मारुतीच्या ईव्ही चे उत्पादन होणार आहे. सध्या टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा तसेच एमजी ऑटो, हुंदई, किया यांच्या इलेक्ट्रिक मोटारी बाजारात आल्या आहेत किंवा येणार आहेत. पुढच्या वर्षी अनेक वेगवेगळ्या इलेक्ट्रिक मोटारी बाजारात येणार आहेत. मारुतीने सात हजार तीनशे कोटी रुपये खर्चून मुख्यतः इलेक्ट्रिक मोटरीच्या बॅटरी बनवण्यासाठी गुजरात मधील हंसलपुर येथे कारखाना उभारला आहे.

Web Title: Mumbai Maruti Suzuki Electric Car Rc Bhargava Maruti Suzuki India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..