

Mumbai-Pune Voters to Get Complimentary McDonald’s Fries on Election Day
sakal
Vote in Mumbai or Pune and Get Free Fries: पश्चिम आणि दक्षिण भारतात मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंट्सची मालकी असलेल्या आणि त्यांचे संचालन करणाऱ्या वेस्टलाईफ फूडवर्ल्ड कंपनीने, १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या बीएमसी आणि पीसीएमसी निवडणुकांच्या निमित्ताने मुंबई आणि पुण्यातील मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी एक साध्या, आनंददायी कृतीने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, ज्या ग्राहकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि जे रेस्टॉरंटमध्ये बसून ऑर्डर देतील, त्यांना मुंबई आणि पुण्यातील मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंटमध्ये मोफत रेग्युलर फ्राईज मिळतील.