
- डॉ. इलाक्षी गुप्ता
आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. डॉक्टर असल्याने ती खूप शिस्तप्रिय होती आणि आत्ताही आहे. अभ्यासाबरोबरच नृत्य आणि विविध कलागुणांमध्ये पुढे येण्यासाठी तिनं मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. माझं व्यक्तिमत्त्व प्रभावी होण्यासाठी तिनं नेहमीच प्रयत्न केले. त्यामुळेच ती माझी जवळची मैत्रीण बनली.