पुरुषांना आपल्या बायकोनी केलेल्या या ‘हेअरस्टाईल’ आवडत नाही, जाणून घ्या कारणे...

Men do not like this hairstyle made by their wife
Men do not like this hairstyle made by their wife
Updated on

नागपूर : देवाने सर्वांत चांगली निर्मिती केली ती म्हणजे मनुष्याची. त्यातही त्यांनी सर्वांत जास्त सौंदर्य प्रदान केलं महिलांना. समाजात वावरत असताना आपल्याला एक ना अनेक सुंदर महिला-मुली पाहायला मिळतात. त्यांच्या सौंदर्यांवर अनेक पुरुष वेडे होतात. महिलांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक आहे केस... महिला विविध केशरचना करून आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पुरुषांना, त्यांच्या जोडीदारांना त्यांची केशरचना आवडते की नाही हेही पाहणे महत्त्वाचे आहे.

महिला पुरुषांपेक्षा अधिक सुंदर असतात ही गोष्ट मान्य करावीच लागेल. याला विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही. दुसऱ्या बाजूने विचार केला तर महिलांच्या सौंदर्याला तोपर्यंत महत्त्व नाही जोपर्यंत पुरुष बघणार नाही. खरं सांगायच तर महिला तयारच होतात पुरुषांना आपण आकर्षित दिसलो पाहिजे यासाठी. आपण सुंदर दिसावं म्हणून महिला वेगवेगळी केशरचना करीत असतात.

केस हे सर्वांना प्रिय असतात. मरेपर्यंत आपल्या डोक्यावर केस राहावे असे पुरुष किंवा महिलांना वाटत असते. मात्र, पुरुषांच्या नशिबी हे नाही. कारण, एका विशिष्ट वयानंतर पुरुषांचे केस गळायला सुरुवात होते. मात्र, महिलांसोबत असे होत नाही. त्यांचे केस डोक्यावर कायम असतात. कमी झाले तरी थोडेफार प्रमाणात. मात्र, अनेक महिला-मुलींना माहिती नाही की त्यांच्या केसांची कोणती शैली जोडीदारास आकर्षित करते आणि कोणती नाही. तेव्हा महिलांनी केणतीही केशरचना करण्यापूर्वा या गोष्टींचा विचार करायाल हवा.

गोंधळ बन (Messy Bun)

कधी त्रास आल्यास किंवा वेळ नसल्यात महिला-मुली गोंधळ बन (Messy Bun) ही केशरचना करतात. ही केशरचना कमी वेळात होत असल्याने याला अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र, ही केशरचना तुमच्या जोडीदाराला किंना प्रियकराला आवडत नाही, असे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. असे नही की त्यांना ही केशरचना अजिबात आवडत नाही. साडी घातल्यानंतर ही केशरचना केल्यास पुरुषांना आपली जोडीदार अधिक आकर्षित दिसत असते. तेव्ही ही केशरचना कोणत्या कपड्यांवर करत आहात याचा विचार करायला हवा.

शेगी केशरचना (Shaggy Hairdo)

ज्या महिला-मुलींचे केस कोरडे असतात तसेच आपल्या केसांची काळजी घेत नाही अशा महिला बिनकामाच्या वस्तूंनी शेगी केशरचना करीत असतात. मात्र, ही केशरचना पुरुषांना अजिबात आवडत नाही. तेव्हा आपल्या केसांकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. स्त्रिया असो किंवा पुरुष दोघांनाही केसांप्रती विशेष आवड असते. केस चांगले नसेल तर आपले सौंदर्य उठून दिसत नाही. यामुळे महिलांनी केसांची काळजी घेणे फार गरजेचे झाले आहे.

बेसिक पोनीटेल (Basic Ponytail)

बेसिक पोनीटेल ही केशरचना अनेक पुरुषांना आवडत असते. अशी केशरचना करणाऱ्या मुली-महिलांच्या प्रेमात ते पडत असतात. मात्र, एकदा तुम्ही त्यांच्या आयुष्यात गेले की त्यांना तुम्ही नेहमी अशी केशरचना केलेली आवडत नाही. कारण, अनेक मुलांना ही केशरचना सामान्य वाटत असते. तर काहींच्या मते यात मुली-महिला चांगल्या वाटतात. मात्र, महिलांनी आपल्या जोडीदाराला प्रसन्न करण्यासाठी आपल्या केशरचनेत बदल करीत राहावा.

टाइट टॉप क्नोट्स (Tight Top Knots)

टाइट टॉप क्नोट्स म्हणजे उच्च बन केशरचना आहे. ही केशरचना तुम्ही डोक्याच्या मध्यभागी बनवू शकतात. यामुळे तुम्ही जास्त उंच दिसाल. ही केशरचना आपल्याला गोंधळलेल्या केसांच्या समस्येपासून दूर ठेवते तसेच सतत केस सावरण्याच्या त्रासापासून मदत करते. मात्र, तुमचा जोडीदार तुम्हाला सतत या केशरचनेत पाहणे पसंत करीत नाही. अनेक पुरुषांना ही केशरचना कंटाळवाणी वाटते. 

खूप लांब केस (Excessively Long Hair)

अनेक पुरुषांना महिला-मुलींचे लांब केस फार आवडतात. मात्र, हेही खरं आहे की जास्त लांब केसही पुरुषांना आवडत नाही. काही मुलींचे केस गुडघ्यांच्या खाली गेलेले असतात. बहुतेक मुलांना-पुरुषांना आपल्या जोडीदाराचे असे लांब केस आवडत नाही. त्यामुळे जास्त लांब केस ठेवताना महिलांनी एकदा विचार करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com