Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Healthy Menopause: मोनोपोझच्या काळात महिलांना अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Healthy Menopause:
Healthy Menopause: Sakal

Natural remedies for healthy menopause read full story

प्रत्येक महिला तिच्या आयुष्यात मोनोपॉझमधून जावे लागते आणि या काळात त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. 45 ते 50 वयाच्या महिलांमध्ये मोनोपॉझची समस्या निर्माण होऊ शकते. याची लक्षणे खुप आधी दिसून येतात.

मोनोपॉझमध्ये महिलांच्याशरीरात हार्मोनल बदल होतात यामुळे चिडचिडपणा वाढणे,थकवा येणे यासरख्या समस्या उद्भवतात. याशिवाय मोनोपॉझ दरम्यान महिलांनी आहाराची काळजी घेतली नाही तर त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हेल्दी मोनोपॉझसाठी महिलांनी त्यांच्या आहार आणि जीवनशैलीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

संतुलित आहार

मोनोपॉझच्या काळात संतुलित आणि पोषक घेणे खुप गरजेचे असते. तुमच्या आहारात फळं, भाज्या, धान्ये आणि कडधान्ये अशा सर्व पोषक घटकांचा समावेश करावा. समतोल आहार महिलांच्या हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतो. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

मॅग्नेशियम

मोनोपॉझ दरम्यान महिलांचा मूड स्विंग होतो. अशावेळी मॅग्नेशियम युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. मॅग्नेशियम मोनोपॉझ दरम्यान होणारे मूड स्विंग कमी करण्यास मदत करू शकते. मोनोपॉझ दरम्यान, मॅग्नेशियम क्रॅम्प, मूड बदलणे आणि निद्रानाश यांसारखी लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते. मॅग्नेशियमसाठी महिला त्यांच्या आहारात सुखामेवा, पालेभाज्या आणि संपूर्ण धान्य समाविष्ट करू शकतात. याचा फायदा महिलांना होऊ शकतो.

ओमेगा -3

मोनोपॉझ दरम्यान अनेक महिलांना सांधे दुखीचा त्रास, छातीत जळजळ होत असेल तर तुमच्या आहारात सॅल्मन फिश, चिया सीड्स, तीळ, अक्रोड आणि फ्लेक्ससीड्स सारख्या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करावा. ओमेगा -3 हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे आणि जळजळ कमी करण्यास देखील मदत करू शकते.

Healthy Menopause:
Spectacle Mark: चष्मा लावल्यामुळे नाकावर डाग पडला असेल तर 'असे' करा स्वच्छ

फायबर

मोनोपॉझ दरम्यान अनेक महिलांना पोटाशी संबंधित समस्या असतात जसे की बद्धकोष्ठता आणि सूज येणे. अशावेळी जर तुम्ही तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. फायबर पचनासाठी आवश्यक आहे आणि सूज येणे आणि बद्धकोष्ठता यांसारखी लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात धान्य, कडधान्ये, फळे, भाज्या, सॅलड यांचा समावेश करू शकता.

हायड्रेशन

मोनोपॉझ दरम्यान कोरडी त्वचा आणि शरीरातील उष्णता यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी दिवसभर हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे. जास्त पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि शरीर हायड्रेट राहते. यासोबतच भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकता येतात. महिलांनी दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. तुम्ही तुमच्या आहारात हर्बल चहाचाही समावेश करू शकता, कॅमोमाइल आणि ग्रीन टी प्यायल्याने मन शांत होते आणि चांगली झोप येण्यासही मदत होते.


डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com