esakal | नेकपीसची लेयरींग करा अन् दिसा अधिक सुंदर

बोलून बातमी शोधा

neck piece layering tricks for stylish look nagpur news

आकर्षक लूकसाठी तुम्ही अनेक अ‌ॅसेसरीजला तुमच्या स्टाईलचा हिस्सा बनवू शकता. मात्र, लेटेस्ट टेंडचा विचार केल्यास नेकपीसची लेयरिंगचा ट्रेंड फार प्रसिद्ध आहे. आज त्याबाबतच आम्ही काही ट्रेंड्स तुम्हाला सांगणार आहोत.

नेकपीसची लेयरींग करा अन् दिसा अधिक सुंदर
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : अ‌ॅसेसरीजमुळे तुमचे लूक एकदम हटके दिसते, यामध्ये काहीच शंका नाही. सिंपल आऊटफिटसोबत अॅसेसरीज घातल्यास एक स्टायलिश लूक दिसू शकतो. आकर्षक लूकसाठी तुम्ही अनेक अ‌ॅसेसरीजला तुमच्या स्टाईलचा हिस्सा बनवू शकता. मात्र, लेटेस्ट टेंडचा विचार केल्यास नेकपीसची लेयरिंगचा ट्रेंड फार प्रसिद्ध आहे. आज त्याबाबतच आम्ही काही ट्रेंड्स तुम्हाला सांगणार आहोत.

लांबीनुसार लूक कसा दिसतो ते बघा -
तुम्ही नेकपीसची लेयरिंग करत असाल तर त्यासाठी हे एक आवश्यक ट्रिक आहे. तुम्ही खूप सारे नेकपीस मिळून एक नेकपीस बनवत असाल तर तुम्हाला त्याच्या लांबीसोबत खेळावे लागेल. पार्टीपासून तर वेस्टर्न वियर आटऊफिटसोबत तुम्ही हे लूक करू शकता.

हेही वाचा - 'सरकारने पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये'; नाभिक संघटनेची विनवणी;...

वन टोन्ड लूक -
तुम्ही सेफ आणि स्मार्ट रितीने नेकपीसची लेयरिंग करत असाल तर ही ट्रीक तुम्हाला अधिक कामात येईल. एकच टोन्ड वाल्या ज्वेलरी क्लब करू शकता. किंवा दोन ज्वेलरी एकमेकांसोबत पेयर करू शकता. त्यामध्ये पेंडेट असेल तर लूक आणखीनच हटके दिसेल.

हेही वाचा - भयंकर प्रकार! कोरोनाचे अर्धवट जळालेले मृतदेह...

मल्टी कलर स्टोनचा वापर -
तुम्ही चेन नेकलेसला एका वेगळ्या स्टाईलमध्ये कैरी करत असाल तर स्टोन हा चांगला पर्याय आहे. वेगवेगळ्या रंगाच्या स्टोन्समुळे कलरफूल लूक येईल. मिक्स अँड मॅच करून तुम्ही योग्य लूक देऊ शकता.

एकच स्टाईल -
तुम्हाला नेकपीसच्या लेयरिंगमध्ये मिक्स अँड मैच लूक आवडत नसेल तर तुम्ही हा लूक करू शकता. त्यासाठी तुम्ही प्री-लेयरींग करू शकता. त्यासाठी तुम्ही एकाच स्टाईलची निवड करू शकता. अशा लेयर्ड नेकपीसमुळे तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल.