Necklace Design Blouse : ब्लाऊज डिझाइनमधील नवा ट्रेंड; प्रत्येक साडीवर नेकलेस ब्लाऊज हवाच

एथनिक वेअर साडी, लेहेंगा किंवा कुर्ता यामध्ये गळ्याभोवती असलेल्या डिझाइनला खास महत्त्व
Necklace Design Blouse
Necklace Design Blouseesakal

Blouse Design Pattern : एथनिक वेअर साडी, लेहेंगा किंवा कुर्ता यामध्ये गळ्याभोवती असलेल्या डिझाइनला खास महत्त्व आहे. परफेक्ट फिटिंग आणि परफेक्ट नेक डिझाइनमुळे कोणताही ड्रेस किंवा साडी अधिकच सुंदर दिसते. पारंपारिक काठपदर साडी असेल तर त्यावरही नेकलेस पॅटर्न ब्लाऊज खुलून दिसतो. अशा ब्लाऊजवर वेगळे काही दागिना घालण्याचीही गरज भासत नाही.

Necklace Design Blouse
Mangalsutra Designs: पहा एकापेक्षा एक भारी महाराष्ट्रीयन मंगळसूत्र

शॉपिंग करताना साडी किंवा लेहेंगा हेवी वर्क असलेले निवडले जातात. पण, नेक डिझाईनकडे खास लक्ष दिले जात नाही. अशावेळी तूम्ही गोंधळून जाऊ नका. सध्या फॅशन ट्रेंड असलेले कपडे घालायचे असतील तर नेकलेस डिझाइन असलेले ब्लाऊज निवडावे. त्यावर हेवी, जरदोशी वर्क केलेले असावे.अशा डिझाइनचे एकच कॉमन रंगाचे ब्लाऊजही तूम्ही बनवू शकता. ज्यामूळे ते अनेक साड्यांवर घालता येईल. ते क्रॉस मॅचिंग म्हणूनही वापरता येईल.

Necklace Design Blouse
बॉलीवुड सेलिब्रिटी Dress Designer जोडप्याचं लग्न थाटात

सध्या साडीमध्ये अनेक प्रकार आले आहेत. असंख्य डिझाइन्स आणि असंख्या रंग उपलब्ध आहेत. यात सध्या पार्टीवेअर साडीला महिलावर्गाची अधिक पसंती मिळत आहे. पार्टीवेअर साड्या सिल्क, नेट आणि ब्रासोमध्येही उपलब्ध आहेत. अशा साड्यावरही फुल वर्क असलेले नेकलेस ब्लाऊज घालता येते. ते तूमचा लुक अधिकच खास बनवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com