esakal | एकदम कडक! सुपरमॉडेल की सुपरस्टार? गोल्डन बॉयच्या Style वर तरुणी फिदा I Neeraj Chopra
sakal

बोलून बातमी शोधा

Neeraj Chopra
स्टायलिश नीरज मॉडेल्सना मागे टाकताना दिसतोय.

एकदम कडक! सुपरमॉडेल की सुपरस्टार? गोल्डन बॉयच्या Style वर तरुणी फिदा

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Neeraj Chopra Latest Photoshoot : गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Golden Boy Neeraj Chopra) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. खेळाव्यतिरिक्त नीरज टीव्ही शो, अभिनय आणि आता फॅशनच्या दुनियेतही पहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून नीरज काही मासिकांसाठी फोटोशूट करताना दिसतोय. आता त्यानं 'द मॅन' नावाच्या मासिकासाठी नुकतच फोटोशूट केलंय. सूट, ट्रेंच कोट आणि स्टायलिश ग्लासेसमध्ये नीरज मॉडेल्सना मागे टाकताना दिसतोय.

नीरजचे नवीन फोटो शेअर करताना मॅगझिननं लिहिलंय, हा सुपरमॉडेल आहे, की सुपरस्टार? आमच्या ऑक्टोबरच्या कव्हर पेजवर भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आहे, जो क्रीडा जगतातील प्रत्येकाच्या हृदयाचा राजा बनलाय, असं त्यांनी म्हटलंय. नीरजनं रेमंड सूट आणि ट्रेंच कोट घातलाय. यासोबतच त्यानं टायटन्स घड्याळही घातलंय. नीरजचा हा संपूर्ण लूक एकदम आकर्षक दिसतोय आणि या त्याच्या लूकवर आता तरुणी देखील फिदा होताना दिसताहेत.

याआधी, नीरजनं प्रसिद्ध डिझायनर रोहित बलच्या आउटफिट्समध्ये शानदार फोटोशूट केलं होतं. त्यानं हे फोटो इन्स्टाग्रामवरही शेअर केले होते. नीरजनं पारंपरिक पोशाखात हे खास फोटोशूट केले होते. कुर्ता आणि शेरवानीमध्ये नीरज लोकांना आकर्षित करताना दिसतोय. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यापासून नीरज प्रत्येकाच्या पसंतीस उतरलाय.

हेही वाचा: ऑलिम्पियन नीरज चोप्राची Style भाल्यापेक्षा महागडी

ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर, नीरज चोप्रानं इंडिया टुडे स्पाइस मॅगझिनच्या कव्हर पेजसाठीही फोटोशूट केलं होतं. नीरजनं या फोटोशूटसाठी घातलेला स्वेटशर्ट (sweatshirt) 'फॅशनेबल दुनियेत' खूपच चर्चेचा विषय बनला होतो. हा स्वेटशर्ट एडवर्ड लालरेम्पिया (Edward Lalrempuia) यांनी डिझाइन केला होता. जांभळ्या-काळ्या स्वेटशर्टमध्ये नीरज चोप्रा एकदम आकर्षक दिसत होता.

loading image
go to top