
Negative Personality : निगेटिव्हीटी तुमच्या डोक्यावर चढून बसलीये का? असं करा Self Analysis...
Self Analysis About Negativity : आपल्या आसपास अनेक प्रकारचे लोक वावरतात. काही लोक प्रचंड निगेटिव्ह असतात. त्यांच्यामुळे वाण नाही पण गुण आपल्याला लागण्याची दाट शक्यता असते. अशावेळी आपल्या आजुबाजूच्या वातावरणाने आपल्यातही नकळत नकारात्मकता वाढते. आपल्याला वाटत असते की आपण फार पॉझिटिव्ह आहोत, पण आपल्यातही नकळत ती नकारात्मकता वाढवणाऱ्या सवयी तर नाही ना हे ओळखणे गरजेचं असते.
आरोग्यावर परिणाम
या नकारात्मकतेचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होत असतो. शिवाय हा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवरही दिसतो.
यामुळे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर नैराश्य, आत्मविश्वासाची कमी, इतरांना कमी लेखत स्वतःविषयीही शंका निर्माण होणे.
शारीरिक आरोग्यावरही याचा परिणाम होतो.
सतत थकवा वाटतो, बीपी, मधुमेह, निद्रानाश अशा आजारांना सामोरे जावे लागते.
निगेटिव्हिटी वाढतेय कसे ओळखाल?
इतरांमध्ये दोष शोधणे - आपण बहुतेक अशा लोकांसोबत वावरत असतो जे सतत दुसऱ्यांच्या चुका शोधत असतात. जर तुम्हालाही अशी सवय असेल तर तुमच्यात नकारात्मकता वाढत आहे.
टिका सहन न होणे - नकारात्मक लोक सहसा टिका सहन करू शकत नाहीत. असे लोक जर त्यांची कोणी चुक दाखवली तर भांडण करायला तयार असतात.
भूतकाळात वावरणे - वर्तमानात राहण्याऐवजी भूतकाळातल्या दुःखाला आठवत बसणे, भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमणे यामुळे नकारात्मकता वाढते.
जज करणे - लोकांविषयी गॉसिपींग करणे नकारात्मकतेची निशाणी आहे. असे बरेच लोक बघितले असतील जे लोकांच्या पाठीमागे त्यांची खिल्ली उडवत असतात. नावं ठेवत असतात.
अडचणींवर फोकस करणे - बऱ्याचदा आपण एवढे निगेटिव्ह होतो की, फक्त अडचणींवर फोकस करत असतो. त्यावर मात करण्यापेक्षा खचून जातो.