New Year Celebration Outfit : न्यू ईयर पार्टीसाठी ट्राय करा समांथा अन् कियारासारखा खास लुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Year celebration outfit

New Year Celebration Outfit : न्यू ईयर पार्टीसाठी ट्राय करा समांथा अन् कियारासारखा खास लुक

New Year celebration outfit : न्यू इयर पार्टीची सर्वांनाच उत्सुकता असते. या दिवशी होणाऱ्या लेट नाईट पार्टीसाठी प्रत्येक मुलीला काहीतरी हटके लूक करायचा असतो. बऱ्याचदा तर बी टाऊनच्या सेलेब्रेटींचे लुक्स आपल्याला करावेसे वाटतात. पण या सगळ्यातून काहीतरी खास निवडायचं असेल तर ? तर अजिबात वेळ दवडू नका. न्यू इयर इव्हसाठी ग्लॅमरस बॉलीवूड अभिनेत्रींकडून इन्स्पिरेशन घेऊन, तुम्ही सर्वोत्तम पार्टी आउटफिट्स कॅरी करू शकता. कियाराने कॉफी विथ करण शोसाठी हा ऑफ-व्हाइट कॉर्सेट मिडी ड्रेस घातला होता. नवीन वर्षाच्या पार्टीसाठी तुम्ही कॉर्सेट ड्रेस देखील ट्राय करू शकता.

हेही वाचा: China Accident : थंडीने केला घात! धुक्यामुळे चायनाच्या 200 वाहनांचा ब्रिजवरती अपघात

समांथाने अलीकडेच हॉट पिंक फ्रिंज मिनी ड्रेस स्टाईल केला होता. यात ती खूपच सुंदर दिसत होती. समांथा प्रमाणेच हॉट आणि फिट दिसण्यासाठी शॉर्ट फ्रिंज ड्रेसची निवड तुम्ही करू शकता. बॉलिवूडचा सर्वात फेमस ट्रेंड म्हणजे बॉडीकॉन गाऊन किंवा ड्रेस. या बॉडी हगिंग ड्रेसमध्ये मुली सडपातळ दिसतात. ज्यांना न्यू इयर पार्टीसाठी हॉट आणि सेक्सी दिसायचं आहे त्या मुली हा आऊटफिट निवडू शकतात.

हेही वाचा: Mughals Ruled India : सेनापतींच्या जीवावर मुघलांनी भारतावर केलं होत राज्य

शिमर आणि ग्लिटर या वर्षभरात खूप ट्रेंडमध्ये होते. एथनिक ते वेस्टर्न कपड्यांपर्यंत सिक्विनचे ​​काम पाहायला मिळाले. पार्टीमध्ये प्रत्येकाचे लक्ष तुमच्याकडे वेधण्यासाठी तुम्ही सेक्विन वर्क असलेला शर्ट किंवा पँट घालू शकता. मिक्सिंग आणि मॅचिंग करून तुम्हाला परफेक्ट लुक मिळेल.