Mughals Ruled India : सेनापतींच्या जीवावर मुघलांनी भारतावर केलं होत राज्य

मुघलांनी भारतावर 200 वर्षे राज्य केलं
Mughals ruled India
Mughals ruled Indiaesakal

Mughals ruled India : मुघलांनी भारतावर 200 वर्षे राज्य केलं. दिल्ली आणि आग्र्यात बसून संपूर्ण हिंदुस्थानचं साम्राज्य चालवलं. पण यात महत्वाची भूमिका बजावली ती मुघल सेनापतींनी. त्यांनी मुघल साम्राज्य वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक इतिहासकार सांगतात की, असे अनेक प्रसंग आले जेव्हा मुघल साम्राज्य धोक्यात आलं मात्र मुघल सेनापतींनी ते साम्राज्य शत्रूंपासून वाचवले. हुमायूनच्या मृत्यूनंतर साम्राज्य हाती घेणारा बैराम खान असो की मुघलांची व्याप्ती काबूलपर्यंत वाढवणारा सेनापती राजा मानसिंग आणि अकबराचा नवरत्न राजा मानसिंग असो.

Mughals ruled India
China Accident : थंडीने केला घात! धुक्यामुळे चायनाच्या 200 वाहनांचा ब्रिजवरती अपघात

ताशकंदी: मुघलांचा सर्वात वादग्रस्त सेनापती

ताशकंदीला मीर बाकी म्हणूनही ओळखले जाते. मीर उझबेकिस्तानची राजधानी असलेल्या ताश्कंदचा रहिवासी होता. तो मुघल इतिहासातील सर्वात वादग्रस्त सेनापती होता. भारतात मुघल साम्राज्याचा पाया घालणाऱ्या बाबरच्या काळात त्याची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्याकडे अवध प्रांताची जबाबदारी देण्यात आली होती. 1528 मध्ये मीरला अफगाणांना रोखण्याची जबाबदारी देण्यात आली होती, परंतु अफगाणांनी 1523 मध्ये लखनौवर कब्जा केला. या पराभवाचे खापर मीरवर फोडण्यात आलं. या पराभवामुळे संतप्त झालेल्या बाबरने मीरची सैन्यातून हकालपट्टी केली. मात्र, नंतर मुघलांनी तो प्रदेश ताब्यात घेतला.

Mughals ruled India
Chutney Recipe for Winter : थंडीत लाभदायक अशी कोथिंबीर आणि शेंगदाण्याची स्पेशल चटणी

बैराम खान: हुमायूनच्या मृत्यूनंतर मुघलांच साम्राज्य वाचवलं

भारतातील मुघल साम्राज्य वाचवण्यात बैराम खानची भूमिका महत्वाची होती. मुघल सम्राट हुमायूनच्या मृत्यूनंतर अकबराला सिंहासनावर बसवून दिल्ली परत काबीज केल्याचं श्रेय बैराम खानला दिलं जातं. बैराम हा हुमायूनचा सर्वात विश्वासू होता. 1556 मध्ये हुमायूनचा मृत्यू झाला तेव्हा मुघल साम्राज्य धोक्यात आलं. हा तो काळ होता जेव्हा बैराम अनेक आव्हानांना तोंड देत होता. याच काळात सुरी घराण्यातील सिकंदर शाह सूरीचा मुघल साम्राज्यावर डोळा होता आणि राजकुमार अकबराच्या संरक्षणाची जबाबदारीही त्याच्याकडे होती. बैरामने मुघल साम्राज्यही वाचवले आणि अकबराला सत्तेवर बसवले.

Mughals ruled India
डायबेटिस असणाऱ्यांनी चुकूनही करु नये 'ही' योगासनं : Health Tips

अली कुली खान : अफगाणांचे बंड थोपवले

अली कुली खानने त्याच्या सुरुवातीच्या काळात हुमायूनची सेवा केली आणि नंतर त्याचा मुलगा अकबर यांच्या कार्यकाळात मुघल सैन्याची कमान हाती घेतली. पूर्व उत्तर प्रदेशातील अफगाणांचे बंड थोपवण्याची जबाबदारी अलीकडे आली. अफगाणांनी दोन वर्षे उठाव केला आणि 1567 मध्ये परिस्थिती सामान्य झाली. 1567 मध्ये युद्धादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Mughals ruled India
Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

मुनीम खान: बंगाल प्रांताचा पहिला मुघल गव्हर्नर

हुमायून आणि अकबर या दोघांच्याही कारकिर्दीत मुनिम खानने मुघल सेनापतीचं पद भूषवले होते. 1560 मध्ये, अकबराने त्याला मुघल साम्राज्याचे पंतप्रधान केले आणि खान-ए-खाना ही पदवी बहाल केली. 1564 मध्ये, मुनीम खानला जौनपूरचा गव्हर्नर बनवण्यात आले आणि 1574 ते 1575 पर्यंत तो बंगाल प्रांताचा पहिला मुघल गव्हर्नर होता.

Mughals ruled India
Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

मानसिंग : काबूलपर्यंत साम्राज्याचा विस्तार करणारा सेनापती

निडर योद्धा आणि सेनापती असण्यासोबतच राजा मानसिंग हे नवरत्न देखील होते. अकबराच्या साम्राज्याचा काबूलपर्यंत विस्तार करण्यात मानसिंगने महत्त्वाची भूमिका बजावली. 21 डिसेंबर 1550 रोजी राजस्थानमधील अंबर येथे जन्मलेले मानसिंग हे राजा भगवानदास यांचे पुत्र होते. मानसिंग हे अकबराच्या बेगम जोधाबाईचे भाऊ होते. जोधाबाईशी लग्न केल्यानंतर अकबराने त्यांना मुघल सैन्याचा सरसेनापती बनवले. संपूर्ण मुघल सैन्याचा लगाम मानसिंगकडे सोपवला. मुघलांच्या काळात वेगवेगळी नावे देण्याची परंपरा आहे. म्हणूनच अकबराने त्याला कधी फर्जद तर कधी मिर्झा राजा असे नाव दिले.

Mughals ruled India
Gautami Patil Lavani Dance Life: 'त्या' एका गाण्यामुळे गौतमीची ओळख कशी बदलली?

महावत खान : जहांगीरला पकडणारा सेनापती

महावत खानचे पूर्ण नाव जमान बेग होते. जहांगीरच्या राज्याभिषेकापूर्वी महावत खानला ५०० सैनिकांची जबाबदारी देण्यात आली होती. 1605 मध्ये जहांगीर बादशहा झाला तेव्हा महावत खानचा दर्जा वाढला आणि त्याला 1500 सैनिकांची जबाबदारी देण्यात आली. मुघल दरबारातील अनेकांना त्यांची लोकप्रियता खटकत होती. 1626 मध्ये जहांगीरच्या बेगम नूरजहाँने महावतशी गैरवर्तन केले, ज्यामुळे महावात खान यांनी बंड केलं. झेलम नदीच्या काठावरील सम्राट जहांगीरच्या छावणीवर त्याने हल्ला केला आणि बादशहाला कैद केले. मात्र, नंतर जहांगीरची सुटका झाली.

Mughals ruled India
Heart Patients साठी गुलाबी थंडी धोक्याची; कारण...

किलिच खान: मुघलांसाठी लढताना आपला हात गमावला

किलिच खान हा औरंगजेबाचा सेनापती होता. औरंगजेबाने किलिच खानकडून लष्करी प्रशिक्षण घेतलं होतं. मध्य आणि दक्षिण भारतातील युद्धात त्याने मुघल सैन्याचे नेतृत्व केलं होतं. मुघल साम्राज्यासाठी त्याने अनेक लढाया लढल्या, परंतु 1687 मध्ये गोलकोंडाच्या वेढादरम्यान सर्वात धैर्य आणि निष्ठा दाखवली. या लढाईत त्याला तोफेच्या गोळ्याचा मार बसला. या मारामुळे त्याचा संपूर्ण हात तुटला. काही दिवसांनंतर त्याचे निधन झाले. हिमायत सागराजवळ किस्मतपूर इथं त्याचा दफनविधी करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com