Nita Ambani Jewellery: नीता अंबानी यांनी परिधान केला मुघल सम्राट शाहजहानचा 'हा' दागिना, किंमत वाचून फुटेल घाम

Nita Ambani Jewellery : नीता अंबांनी यांनी नुकतीच मिस वर्ल्ड फायनलच्या दिमाखदार सोहळ्याला हजेरी लावली होती. हा अंतिम सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला होता.
Nita Ambani Jewellery
Nita Ambani Jewelleryesakal

Nita Ambani Jewellery : रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी एक सुप्रसिद्ध उद्योजिका असून त्यांचा फॅशन सेन्स कमालीचा आहे. त्यांचा प्रत्येक लूक हा खास आणि रॉयल असतो. साडी आणि आऊटफीट्समधील आकर्षक लूकमुळे आणि ज्वेलरीमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा प्रत्येक लूक हा नेहमीच लक्षवेधी असतो. नुकताच त्यांचा बनारसी साडीतला लूक आणि त्यावरील ज्वलेरी (Nita Ambani Jewellery) चर्चेत आली आहे.

नीता अंबांनी यांनी नुकतीच मिस वर्ल्ड फायनलच्या दिमाखदार सोहळ्याला हजेरी लावली होती. हा अंतिम सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला होता. या ७१ व्या मिस वर्ल्ड फायनलच्या सोहळ्यात नीता अंबानी यांना प्रतिष्ठित ‘ब्युटी विथ अ पर्पज ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यासाठी नीता अंबांनी यांनी बनारसी जंगला साडी नेसली होती. या साडीवर त्यांनी कॅरी केलीली मुघल बादशहाची ज्वेलरी सर्वाधिक भाव खाऊन गेली. त्यांचा हा रॉयल अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Nita Ambani Jewellery
Sonam Kapoor Saree : स्टाईल आयकॉन सोनम कपूरने का नेसली 35 वर्षांपूर्वीची साडी? लग्नातील पारंपारिक लूकसाठी आहे बेस्ट ऑप्शन

मुघल सम्राट शाहजहानची कलगी

या सोहळ्यात नीता अंबानी यांनी परिधान केलेला बाजूबंद हा प्रत्यक्षात मुघल सम्राट शाहजहानची कलगी होती, असा दावा Topophilia या इन्स्टाग्राम पेजने केला आहे. ही कलगी नीता अंबानी यांनी बाजूबंदच्या स्वरूपात परिधान केली होती. या महागड्या बाजूबंदची किंमत ही तब्बल २०० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

एकेकाळी मिर्झा शहाब-उद-दीन मुहम्मद खुर्रम यांनी ही कलगी परिधान केली होती. ज्याला शाहजहान, जहांगीरचा मुलगा आणि 1592-1666 पर्यंत राज्य करणारा पाचवा मुघल सम्राट म्हणूनही ओळखले जाते.

इन्स्टापेज Topophilia ने केलेल्या दाव्यानुसार, नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या या बाजूबंदाची उंची ही १३.७ सेमी आणि रूंदी १९.८ आहे. हा संपूर्ण बाजूबंद सोन्याचा असून त्यावर हिरे, माणिक आणि मौल्यवान खडे आहेत. भारतीय ज्वेलर्सने अवलंबलेल्या ‘पच्थिकाकाम’ (Pachhikakaam) या तंत्राचा वापर करून हा बाजूबंद बनवण्यात आला आहे.

या पेजच्या दाव्यानुसार २०१९ मध्ये लिलावात विक्री होण्यापूर्वी हा सुंदर बाजूबंद ‘आय थानी’ कलेक्शनमध्ये शेवटचा पाहण्यात आला होता. (Mughal Emperor Shah Jahan's Kalgi)

नीता अंबानींचा लूक

या सोहळ्यातील नीता अंबानींच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास नीता अंबानी यांनी चमकदार सोन्याच्या जरीपासून हाताने बनवलेल्या जंगला डिझाईनची बनारसी साडी निवडली होती. ज्यामुळे, त्यांच्या लूकमध्ये आणखी भर पडली. या बनारसी साडीवर सुंदर मीनाकारी वर्क असून नाजूक फुलांची डिझाईन आहे.

या साडीवर त्यांनी स्टेटमेंट एअररिंग्स आणि खड्यांच्या बांगड्यांची निवड केली होती. मेकअपबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी ग्लॅमरस आयशॅडोज, ग्लॉसी लिप्ससहीत मिनिमल मेकअप केला होता. वेव्ही हेअर्स आणि टिकली असा एकूणच सुंदर लूक त्यांनी केला होता. (Nita Ambani Look)

Nita Ambani Jewellery
Alia Bhatt Saree : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आलियाने नेसलेली साडी बनवायला लागले तब्बल 100 तास; पाहा काय आहे खास?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com