#NoBindiNoBusiness: फॅब इंडियाच्या दिवाळी कलेक्शनला नवे वळण

मॉडेल्सनी टिकली न लावल्याने बराच वाद रंगला  
#NoBindiNoBusiness: फॅब इंडियाच्या  दिवाळी कलेक्शनला नवे वळण

फॅब इंडिया या कपड्यांच्या ब्रॅंडची गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरू होती. दिवाळीसाठी त्यांनी जश्न ए रिवाज हे नवे कलेक्शन लॉंच केले होते. त्यातील फोटोवर बराच वादंग माजला. यातील मॉडेल्सच्या कपाळावर टिकली नव्हती. त्यामुळे ट्विटरवर युजर्सनी बिंदी लावण्याची गरज असल्याचे सांगत 'NoBindiNoBusiness' हा हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरुवात केली.यावर अनेकांनी बिंदी हा त्यांच्या ओळखीचा वाद असल्याचे सांगितले. तर बिंदी लावणे ही वैयक्तिक निवड असावी, असा युक्तीवाद अनेकांनी केला.फॅबइंडियाच्या जाहिरातीतील मॉडेलचा फोटो ट्विट करत लेखिका शेफाली वैद्य यांनी या प्रकरणावर भाष्य केले. त्यानंतर मात्र अनेकांनी बिंदीबाबत त्यांचे मत प्रदर्शित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com