तुमचा ऑफिस लुक परफेक्ट बनवण्यासाठी काही खास टिप्स; आत्मविश्वासही वाढेल

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत, ज्या तुमच्या लूकला पूर्ण करतील.
तुमचा ऑफिस लुक परफेक्ट बनवण्यासाठी काही खास टिप्स; आत्मविश्वासही वाढेल

तुमचा ऑफिस लुक आणि ड्रेसिंग सेन्स ऑफिसमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळे ऑफिसमध्ये कपडे कसे असावेत यासंदर्भात बऱ्याचवेळा सल्ला घेतला जातो. ज्या कपड्यात तुम्ही स्वत:ला कूल आणि कम्फर्टेबल असता असे कपडे वापरा असे सांगितले जाते. ऑफिसच्या ड्रेसिंगबाबत सगळ्यांनाच फॉर्मल कपडे आणि शूज पुरेसं वाटतात. मात्र व्यावसायिक स्वरूपासाठी ते पुरेसे नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत. ज्या तुमच्या लूकला पूर्ण करतील.

या अशा टिप्स आहेत ज्या तुम्हाला ऑफिसमध्ये दिसण्याच्या बाबतीत मदत करतील. तुम्ही दिसायला चांगले आणि रुबाबदार दिसत असाल तर तुमचा आत्मविश्वासही वाढेल. त्यामुळे आज आम्‍ही तुम्‍हाला ऑफिसमध्‍ये परफेक्ट लुक मिळवण्‍याच्‍या अगदी सोप्या टिप्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्ही ऑफिसमध्‍ये स्टायलिश दिसाल आणि तुमचा लूकही परफेक्ट दिसेल.

तुमचा ऑफिस लुक परफेक्ट बनवण्यासाठी काही खास टिप्स; आत्मविश्वासही वाढेल
Share Market : येत्या आठवड्यात 'हे' 5 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

आरामदायक कपडे निवडा

अनेकांना फॉर्मल्स कपड्यांमध्ये आराम किंवा कम्फर्टेबल वाटत नाही, अशांनी त्यांची शैली बदलली पाहिजे. अनेकांना घट्ट किंवा सैल कपडे परिधान केल्यानंतर अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे तुम्हाला आरामदायक वाटतील असे कपडे आणि डिझाइन निवडून कपडे परिधान करु शकता. निवडलेले हे कपडे तुमच्या आकाराचे असावेत. काहीवेळा तुम्हाला ऑफिसमध्ये खास प्रसंगी ड्रेसकोडही पाळावा लागतो.

ट्रेंडचा मागोवा ठेवा

ऑफिसमध्ये प्रोफेशनल आणि प्रेझेंटेबल दिसण्यासाठी तुम्ही आकर्षक पोशाख निवडणे महत्वाचे आहे. यासोबतच तुमच्या प्रोफेशनल आउटफिट्समधील ट्रेंडचीही काळजी घ्यायला विसरू नका. जर तुम्ही बदलानुसार कपडे निवडले तर ते तुम्हाला ऑफिसमध्ये परफेक्ट लूक देण्यास मदत करेल.

ऋतूनुसार कपडे वापरा

ऑफिसमध्ये स्टायलिश आणि परफेक्ट लूक मिळवण्यासाठी सीझन वाईज कपडे परिधान करणे गरजेचे आहे. हिवाळ्यातील स्टायलिश कपडे बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय, तुम्ही ऋतूनुसार समर कूल लुक आणि मॉन्सून एलिगंट लुक निवडूनही परफेक्ट लुक मिळवू शकता.

तुमचा ऑफिस लुक परफेक्ट बनवण्यासाठी काही खास टिप्स; आत्मविश्वासही वाढेल
Sangli Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; जिल्ह्यातील निमसोडच्या तरुणावर गुन्हा

फिटिंग आणि आरामाचा समतोल राखणे आवश्यक

कपड्यांमध्ये परफेक्ट फिटिंग आणि कम्फर्ट यांच्यात योग्य तोल राखणे फार महत्वाचे आहे. चांगले फिटिंग कपडे तुम्हाला प्रेझेंटेबल बनवतात. कोणाला पाहिल्यानंतर कधीही ट्रेंड फॉलो करू नका, तुमच्या सोयीनुसार कपडे निवडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com