Sangli Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; जिल्ह्यातील निमसोडच्या तरुणावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime case, rape case in sangli

एप्रिल महिन्यात हा प्रकार घडला होता, मात्र...

Sangli Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; जिल्ह्यातील निमसोडच्या तरुणावर गुन्हा

कडेगाव (सांगली) : अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून घरात जबरदस्तीने जावून बलात्कार केल्या प्रकरणी तालुक्यातील निमसोड येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात हा प्रकार घडला होता. त्यानंतर संबंधित संशयिताने मुलीचा पाठलाग करून तिला धमकी दिल्यानंतर पालकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी संशयित सचिन सुरेश पवार (वय-23, रा. निमसोड, ता. कडेगाव ) याच्या विरोधात कडेगाव पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याबाबत अल्पवयीन पीडितेने फिर्याद दिली आहे. सचिन पवार याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: Flipkart sale : हे ४ स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की पीडित मुलगी घरी एकटी होती. आई-वडील दुकानात गेले होते. त्यावेळी सचिन पवार त्यांच्या घरी गेला. त्याने तिला ‘तू मला आवडतेस’, असे म्हणत जबरदस्ती केली. तिने विरोध करत त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने बळाचा वापर करत जबरदस्ती बलात्कार केला. ‘याबाबत कुठे वाच्यता केली, कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या आई व वडीलांनी जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी त्याने दिली.

जुलै महिन्यात पीडित मुलगी कराड येथे कॉलेजला एसटी बसने जात असताना त्याने बसचा पाठलाग केला. कराड-सैदापुर कॅनॉलजवळ बसमधून पीडिता खाली उतरली. त्यानंतर तीच्या जवळ जात सचिन पवार याने तिला धमकी दिली. ‘फोन का उचलत नाही’, असे म्हणत आरडा ओरड सुरु केला आणि शिवीगाळ केली. त्यानंतर पालकांना हा विषय लक्षात आला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक पांडुरंग भोपळे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, महिला पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

हेही वाचा: PHOTO : त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आहारात 'या' ज्यूसचा समावेश करा

Web Title: Minor Girl Rape In Sangli Kadegaon Crime Committed Against Youth Of Nimsod

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..