Office Outfit Ideas : ऑफिसमध्ये स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘या’ टिप्सची घ्या मदत

पॅंट-शर्टला ही अनेक पर्याय आहेत, जे तुम्ही ऑफिसमध्ये ट्राय करू शकता
Office Outfit Ideas
Office Outfit Ideas esakal

Office Outfit Ideas : बदलत्या ट्रेंडनुसार तुम्ही तुमचा वॉर्डरोब बदलणे देखील गरजेचे आहे. तुम्ही ऑफिसमध्ये देखील तुमच्या वेगळ्या स्टाईलने इतरांचे लक्ष वेधून घेऊ शकता. त्यासाठी, तुम्हाला फक्त तुमचा वॉर्डरोब लेटेस्ट फॅशन ट्रेंडनुसार अपडेट ठेवावा लागेल.

ऑफिसमध्ये अनेक तरूणी अनेकदा पॅंट-शर्ट घालून जातात. मात्र, सतत पॅंट-शर्ट घातल्याने तुम्हाला बोअर व्हायला होतं. परंतु, पॅंट-शर्टला ही अनेक पर्याय आहेत, जे तुम्ही ऑफिसमध्ये ट्राय करू शकता आणि तुमच्या सिंपल लूकला अनोखा टच  देऊ शकता.

आज आम्ही तुम्हाला खास ऑफिसमध्ये स्टाईल करण्यासाठी काही टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही ऑफिसमध्ये ही स्टाईल करू शकता.

स्वेटर आणि कार्डिगन

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे, अनेक महिला ऑफिसला जॅकेट्स, कार्डिगन आणि स्वेटर घालण्याला पसंती देत आहेत. कोणत्याही फॉर्मल शर्टसोबत किंवा टीशर्ट, स्वेटशर्ट सोबत तुम्ही स्वटेर आणि कार्डिगनचे स्मार्टली लेयरिंग करू शकता. (Sweaters and cardigans)

sweater cardigan
sweater cardiganSakal

यामध्ये तुमचा लूक स्टायलीश आणि फॉर्मल दिसेल यात काही शंका नाही. फक्त स्वेटर आणि कार्डिगनचे रंग हे लाईट शेडमध्ये असायला हवेत ते डार्क असता कामा नये.

जीन्स करा स्टाईल

कॅज्युअल आणि कूल लूकसाठी जीन्सचा नेहमीच विचार केला जातो आणि आजकाल ऑफिसमध्ये जीन्सला महिलांकडून नेहमीच पसंती दिली जाते. जीन्समुळे लूक क्लासी आणि कम्फर्टेबल दिसण्यात मदत होते. (Style jeans)

jeanes with top
jeanes with topSakal

शिवाय, जीन्सवर कोणताही टॉप, शर्ट, जॅकेट, लॉंग कुर्ती आणि शॉर्ट कुर्ती उठून दिसते. त्यामुळे, जीन्स हा ऑफिसवेअरसाठी बेस्ट ऑप्शन ठरतो.

लेदर स्कर्ट विथ शर्ट

लेदर स्कर्टमुळे तुमच्या लूकला क्लासी, स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज मिळतो. ब्लॅक-ब्लू, ब्राऊन रंगाचा लेदर स्कर्ट घ्या आणि त्यावर मस्त फॉर्मल शर्ट, टॉप किंवा लिनन शर्ट घाला. मग, बघा तुमचा लूक कसा क्लासी दिसतो ते. (Leather skirt with shirt)

leather skirt with shirt
leather skirt with shirtSakal

या लेदर स्कर्टवर तुम्ही शर्टसोबतच ब्लॅक-व्हाईट किंवा लाईट शेडमधले टॉप्स ही मॅच करू शकता. यामुळे, तुमचा लूक क्लासी दिसण्यासोबतच प्रोफेशनल ही दिसेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com