
ऑफिसमध्ये १० तास काम करताना पार दमताय! या प्रकारे व्हा रिफ्रेश
नोकरी ही प्रत्येकासाठी महत्वाची असते. लोकं कामाचा आनंद घेत नोकरीत स्थिरावतात. पूर्वी नोकरी (Job) करताना सतत संगणकावर(Computer) काम करणे कमी प्रमाणात असे. पण आजच्या जगात सगळेच कॉम्प्युटर नाहीतर मोबाईलवर (Mobile) विविध प्रकारचे काम करतात. कामाचा तणावही खूप असतो. त्या तणावात (Stress)काम करताना आपण एकाच जागेवर खूप वेळ काम करत राहतो. १० तास काम करून पिट्ट्या पडतो. काही काळाने असं तणावाचं काम केल्याचे परिणाम शरीरावर दिसायला लागतात. मग तुम्ही आजारी पडण्याची शक्यताही जास्त असते. तुम्हाला अशा तणावामुळे स्ट्रेस, बीपी, डोकेदुखी अशा समस्या वाढायला लागतात. हे सर्व टाळून तुम्हाला कामादरम्यान फ्रेश राहायचं असेल तर थोडेसे बदल करावे लागतील. तरच तुमचे आरोग्य (Health)चांगले राहील शिवाय कामाची मजा येईल ती वेगळीच. तुम्ही रोजचे काम करताना या चार प्रकारे ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा: दुपारच्या जेवणात 'हे' सहा पदार्थ खाताय? असे होतील परिणाम

office
१) मधेमधे ब्रेक घ्या- आजकाल सगळीकडे ५ दिवस काम आणि शनिवार-रविवार सुट्टी अशी कामाची पद्धत आहे. त्यामुळे त्या पाच दिवसात ९ तास झोकून देऊन काम करावं लागतं. बरं काम पूर्ण झाल्याशिवाय निघताही येत नाही. साहजिकच वेळ वाढून ९ तासांचे १०-११ तास कधी होतात कळंतही नाही. त्यामुळे ऑफीसमध्ये काम करत असताना थोड्या-थोड्या वेळेचा ब्रेक घेत राहा. पण हा ब्रेक अगदी १० ते १५ मिनिटांचा असू द्या. त्या दरम्यान ऑफीसबाहेर पडून थोडा वॉक करा. सूर्यप्रकाशाचा आनंद घ्या. पुन्हा ऑफिसला जाण्यासाठी लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. कारण सतत बसून राहिल्याने चरबी वाढते.
हेही वाचा: महिन्यात ५ किलो वजन कमी करायचंय? हा घ्या डाएट प्लॅन

sleep at work
२) डोळ्यांची काळजी घ्या- आजकाल लोकांना ऑफिसचे काम कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरून करावे लागते. त्यामुळे कायम डोळे (Eye) स्क्रीनवर असतात. यामुळे डोळे दुखणे, दिसायला त्रास होणे, डोकेदुखी अशा समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे तासभर तरी डोळ्यांना आराम देऊन त्या काळात इतर काम करता येतील का ते पाहा. डोळ्यांवर पाणी मारून ते साफ ठेवा.
हेही वाचा: लेकरांना कसं सांभाळायचं? सुधा मुर्तींनी सांगितल्या 5 खास टिप्स

Fruits
३)डाएटमध्ये फळ खा- कामाच्या पद्धतीमुळे आपल्या खाण्याच्या सवयीही बदलल्या आहेत. अनेकजण तयार पदार्थ खाण्यावर अवलंबून असतात. ऑफिसमध्ये काम करताना आपण किती चहा-कॉपी पितो हेही कळत नाही. त्यामुळे शरीरावर किती परिणाम होतात, याची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे चहा-कॉफी पिण्यावर नियंत्रण ठेवा. डाएटमध्ये फळं खा. तसेच कुठलेही खाणे ब्रेक घेऊन खा. दुपारच्या जेवणात एकदाच सगळं जेऊ नका, दोन-तीन ब्रेकमध्ये हे पदार्थ खा.
हेही वाचा: चाळिशीनंतर अंडं खाणं योग्य का?

walking
४) निसर्गाशी मैत्री करा- आपण पटापट घरातली कामं पूर्ण करून ऑफिसला जायला निघतो आणि उशीरा रात्री घरी येतो. सूर्य, वारा, चंद्र, सूर्य यांची भेट क्वचितच होते. शरीराला सूर्यप्रकाश किंवा ताजी हवा न मिळाल्यास आाजारपण येऊ शकते. तुमच्या हाडांसाठी थेट सूर्यप्रकाश, ताजी हवा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे सतत खुर्चीवर बसण्यापेक्षा मधेच उठून ऑफिसमधून बाहेर पडून उन्हाचा किंवा हवेचा आनंद घ्या. यामुळे तुम्हाला खूप फ्रेश वाटेल.
Web Title: Office Work Pressure After 10 Hour Shift Here Is 4 Easy Tips To Minimize
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..