
थोडक्यात
1. कॅबने प्रवास करण्याआधी रजिस्ट्रेशन नंबर पडताळा, जर नंबर वेगळा असेल तर हेल्पलाइनला कॉल करा.
2. कॅबने प्रवास सुरू करण्याआधी तुमचं लाइव्ह लोकेशन कुटुंबिय किंवा जवळच्या व्यक्तींना शेअर करा.
3. एकट्याने आणि रात्रीच्या वेळी प्रवास करायचा असेल तर अशा वेळी चाइल्ड लॉक असणाऱ्या कॅब टाळा.
Cab Safety Tips for Women: एखाद्या ठिकाणी प्रवास कऱण्यासाठी सध्याच्या घडीला लोकांकडून कॅब सेवेला प्राधान्य दिलं जात आहे. यातही ओला उबरसारख्या सेवा ऑनलाइन मिळत असल्यानं त्याच्या वापराकडे कल वाढला आहे. महिलांसाठी या सेवा सोयीच्या आणि सुरक्षित पर्याय ठरत आहेत. पण कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेप्रमाणेच ओला उबर कॅब वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ऑनलाइन कॅब बूक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सुरक्षेची खात्री करणं महत्त्वाचं आहे. कॅबमध्ये बसण्याआधी आपण आपली सुरक्षितता कशी पडताळायची किंवा काळजी कशी घ्यायची हे पाहू.