Stay Away Old Age : दीर्घकाळ तरुण राहायचे? मग टाळा या ५ वाईट सवयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

young boy

दीर्घकाळ तरुण राहायचे? मग टाळा या ५ वाईट सवयी

आजच्या घडीला कमी वयातच केस पांढरे होणे, टक्कल पडणे अशा समस्या जाणवतात. लहान मुलांचे सुद्धा केस पांढरे झाल्याचे पाहायला मिळते. तसेच कमी वयातच चष्मा लागतो. याला विविध करणे आहे. वयात आलेल्या व्यक्तींनाही अशा समस्या जाणवतात. कमी वयातच वृद्धापकाळाकडे गेल्यासारखे वाटते. सतत थकवा जाणवतो. याला कारणीभूत काही वाईट सवयी असतात. यामुळे शरीराची हानी होते.

जग एकविसाव्या शतकात गेले आहे. प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. तो आपल्या मर्जीने आयुष्य जगू शकतो. यामुळेच की काय व्यक्तीला काही वाईट सवयी जडल्या आहेत. या वाईट सवयींमुळे शरीराची मोठी हानी होते. या सवयी आरोग्यासाठी हानिकारक असतात. तसेच वृद्धत्वाची प्रक्रियाही गतिमान करते. या सवयींवर नियंत्रण आणले तर वृद्धत्वाच्या प्रक्रियेचा वेग कमी करता येऊ शकतो.

हेही वाचा: ...अन् मध्यरात्री आईला मुलगी प्रियकरासोबत दिसली नको त्या अवस्थेत

ताण

कोणत्याही गोष्टीची जास्त काळजी केली तर माणूस लवकर वृद्ध होतो. ते काही मानसिक किंवा शारीरिक आजारांनाही बळी पडू शकतात. तणाव हा अतिशय घातक आणि सायलेंट किलर आहे. त्यामुळे दीर्घकाळ तरुण राहायचे असेल तर जास्त ताण घेणे टाळा.

झोप

पुरेशी झोप न घेणे हे देखील वृद्धापकाळाकडे ढकलण्याचे काम करते. पुरेशी झोप तरुण राहण्यास आणि तणावमुक्त राहण्यास मदत करते. चांगली व पुरेशी झोप घेतल्यास वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. तरुणांमध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे. याचे दुष्परिणाम भविष्यात दिसू शकतात.

वाईट आहार

खराब आहार हे देखील जलद वृद्धत्वासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. २१ व्या शतकात सोडा, प्रक्रिया केलेले अन्न आणि फॅटी फूड यासारख्या गोष्टी आहाराचा मोठा भाग बनलेला आहे. या आहारामुळे आयुर्मानाच्या दरात घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

सक्रिय नसणे

दैनंदिन जीवनशैलीत व्यायाम न करणे किंवा शरीर पुरेसे सक्रिय न ठेवणे याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. मनुष्य सक्रिय नसल्यास रोग लवकर घेरतात आणि तो वेगाने वृद्धत्वाकडे जातो. व्यायाम न केल्याने जैविक, मानसिक आणि शारीरिक असे तीन प्रकारचे परिणाम होतात.

धूम्रपान, मद्यपान

तणाव किंवा चिंता टाळण्यासाठी बरेच लोक दारू, तंबाखू किंवा मादक पदार्थांचे सेवन करतात. याकडे तरुण पिढी अधिक आकर्षित होत आहे. याच्या अतिसेवनाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. याचे सतत आणि जास्त सेवन वृद्धत्वाकडे वेगाने ढकलते.

loading image
go to top