Old Clothes Reuse Idea: जुन्या कपड्यांचा ढिग साचलाय? फेकूनही देऊ वाटत नाहीत, या आयडिया वापरून करा त्यांचा पुर्नवापर

अनेकजण जुने कपडे कचऱ्यात टाकून देतात,त्यांचा असा वापर होऊ शकतो
Old Clothes Reuse Idea
Old Clothes Reuse Ideaesakal

Old Clothes :  आजच्या बदलत्या ट्रेंडमध्ये कपडे आणि त्यांची फॅशनही रातोरात बदलते. काल चांगलं दिसणारं कापड आज डोळ्यांना शोभत नाही. त्यामुळे अनेकदा लोक ४ ते ५ वेळा कापड घालतात आणि फेकून देतात.

अनेकजण जुने कपडे कचऱ्यात टाकून देतात. पण, जुने कपडे अनेक प्रकारे वापरले जाऊ शकतात हे तुम्हाला माहित आहे का? तुमची Creativity पाहून पाहुणे मंडळीही आश्चर्यचकित होतील. तुमच्या आयडियाचे नक्कीच कौतुक करतील. जुने कपडे अनोख्या पद्धतीने कसे वापरावेत. त्यापासून तुम्ही काय काय बनवू शकता हे पाहुयात. 

Old Clothes Reuse Idea
Cloth Stain Removal : कपड्यांवरील हट्टी डाग निघेनात?; उद्या सकाळीच प्रयोग करा, फरक पहा!

जुने कपडे पुन्हा कसे वापरावेत?

फ्रेम तयार करा

जर तुम्हाला तुमचं घर सजवायचं असेल तर जुने कपडे ही तुमची मोठी गोष्ट आहे. एखाद्या कापडावर काही चांगले कोट लिहिलेले असतील किंवा डिझाईन असेल तर तो फोटो फ्रेमच्या आकारात कापून फ्रेममध्ये टाकून भिंतीवर चिकटवावा. ही फ्रेम तुम्ही एखाद्या आर्ट गॅलरीतून विकत घेतल्यासारखी दिसेल.

पॅचवर्क

पॅचवर्कसाठी जुने कपडे वापरू शकता. तुम्ही कपडे कापून एकत्र शिवून पिशव्या, जॅकेट किंवा चादर वगैरे बनवू शकता. तसेच एखाद्या उसवलेल्या कपड्याला पॅचही लावू शकता. (Kitchen Hacks)

Old Clothes Reuse Idea
Sweating Marks on clothes: घामाचे डाग निघता निघत नाही? 4 उपाय, कपड्यांवरचे डाग निघतील पटकन

नवे कपडे बनवा

जुने कपडे कापून नव्या लूकमध्ये मोल्ड करू शकता. मग ते मोठ्या टी-शर्टपासून मुलांचे कपडे बनवणे असो किंवा ट्रेंडी ड्रेस. जुन्या कपड्यांवर थोडीशी शिवणकाम अप्रतिम दिसते. जुन्या कपड्यांपासून तुम्ही पेट्ससाठी ड्रेसही बनवू शकता.

आपण स्क्रॅच बनवू शकता?

आजकाल मुलींना केसांमध्ये रबर बँडऐवजी स्क्रॅच लावायला आवडतात. हे स्क्रॅचेस तुम्ही फॅन्सी प्रिंटेड कापड कापून तुम्ही २ मिनिटात तयार करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला काही Elastic दोऱ्यांची आवश्यकता आहे.

Old Clothes Reuse Idea
Cloth Stain Removal : कपड्यांवरील हट्टी डाग निघेनात?; उद्या सकाळीच प्रयोग करा, फरक पहा!

उशी बनवा

उशा वापरून वापरून त्यांच्यातील मऊपणा जातो. त्यात असलेला कापूस जड होतो. अशा उशा फेकून द्याव्या लागतात. त्यामुळे उशाही फेकून देण्याऐवजी आपले जुने कपडे भरून उशी बनवा. उशी अधिक फुलवण्यासाठी, आपण कपड्यांचे लहान तुकडे करू शकता. तुम्ही यासाठी जूने ब्लँकेट, स्वेटरही वापरू शकता.

तुम्ही गिफ्ट रॅप बनवू शकता

अनेक जुने कपडे दिसायला खूप सुंदर असतात, एकच प्रॉब्लेम आहे की हे कपडे आउट ऑफ ट्रेंड झाले आहेत किंवा आता फिट होत नाहीत. अशावेळी हे कपडे गिफ्ट रॅप म्हणून वापरता येतात. हव्या त्या गिफ्टला बॉक्समध्ये ठेऊन त्यावर चौकोन आकारात कापलेल्या कापडाने गिफ्ट रॅपिंग होऊ शकते.

हे कपडे गिफ्ट रॅप म्हणून वापरता येतात
हे कपडे गिफ्ट रॅप म्हणून वापरता येतातesakal

जून्या साड्या

भारतीय महिलांकडे कपाटे भरून साड्या असतात. ज्या हेवी असतात आणि फार नेसलेल्याही नसतात. अशा साड्या कोणालातरी देऊन टाकणं जीवावर येतं. या साड्यांपासून तुम्ही स्वत: डिझाईन केलेले ड्रेस बनवू शकता. पैठणी ड्रेस हे यामुळेच ट्रेंडमध्ये आले आहेत.

जून्या पैठणी साडीचा ड्रेस सध्या ट्रेंडींग आहे
जून्या पैठणी साडीचा ड्रेस सध्या ट्रेंडींग आहेesakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com