आंतरराष्ट्रीय कॉफी दिन : कॉफी आणि बरंच काही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

ऑक्टोबर महिन्यातील पहिली सकाळ म्हणजे एक ऑक्टोबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कॉफी दिन' म्हणून साजरा केला जातो. 

पुणे : सुरवातीच्या काळामध्ये चहाला पर्याय म्हणून कॉफीची ओळख असायची. आता ही ओळख बदलली असून अभ्यासासाठी जागलेल्या रात्रीचा, ऑफिसमधल्या ओव्हर टाईमचा, बायकोसोबतच्या स्वप्नाळू गप्पांचा म्हणजेच एकमेकांसोबत डेट करण्यापासून ते मिटींगला भेटल्यावरही कॉफीला प्राधान्य मिळताना दिसते. आजही एखादी भेट घडवून आणायची असेल तरीही चहा कॉफी घेतलीच जाते. ऑक्टोबर महिन्यातील पहिली सकाळ म्हणजे एक ऑक्टोबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कॉफी दिन' म्हणून साजरा केला जातो. 

प्रत्येकजण कधी आळस, कंटाळा आला असेल किंवा मूड फ्रेश ठेवण्यासाठी चहा किंवा कॉफी पिण्यास प्राधान्य देतात. फॅमिली, मित्र मैत्रीणी सोबत गप्पा रंगवायच्या असो कि काम करताना स्वतःला रिचार्ज व्हायचे असो तर कॉफी काफी आहे. वाफाळती कॉफी समोर आली तर विचारायलाच नको, कधी एकदा कॉफी पिऊन घेऊ असे होते. 

कॉफी एक एक पेय आहे. अनेकांना कॉफी खूप आवडते. कॉफी जगभर प्यायली जाते. कॉफी तरतरी आणणारी, खास चव आणि स्वाद असलेली एक उत्तेजक पेय आहे. कॉफीमध्ये ग्रीन कॉफी, ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी, कोल्ड कॉफी, फिल्टर कॉफी, एस्प्रेसो कॉफी, कॅपुचिनो कॉफी, लाटे कॉफी, माकीयाटो कॉफी हे प्रकार ही अनेकजण आवडीने पितात. काही लोक तर कॉफीशिवाय जगूच शकत नाहीत. बरेचजण मूड फ्रेश ठेवण्यासाठी कॉफी पितात कॉफी पिल्यावर शरीरातील आळस आणि सुस्ती निघून जाते. त्यामुळे कॉफी लव्हर कॉफी पिण्यासाठी कधीच नाही बोलत नाहीत.  

काही वर्षांपर्यंत कॉफी म्हणजे एक हायक्लास ड्रिंक असं म्हटलं जायचं. पण आता याची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन घराघरामध्ये कॉफी पोहचलेली दिसून येत आहे. कॉफीला अनेक उपमाही दिलेल्या आहेत. चहा म्हणजे उत्साह तर कॉफी म्हणजे स्टाईल. चहा म्हणजे मैत्री तर कॉफी म्हणजे प्रेम. जगभरात कोठेही जावा शाळा, कॉलेज आणि ऑफिस येथे आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये कॉफी लव्हर असतोच. चहा प्रेमीप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये एक कॉफी प्रेमी पाहायला मिळतोच.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One october is celebrated as International Coffee Day