Optical Illusion | ही दोन चित्रे दिसायला आहेत सारखी; पण त्यांत लपले आहेत ५ फरक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Optical Illusion

Optical Illusion : ही दोन चित्रे दिसायला आहेत सारखी; पण त्यांत लपले आहेत ५ फरक

मुंबई : सोशल मीडियावर अनेक वेगवेगळी कोडी तुम्ही पाहिली असतील. काही कोड्यांमध्ये तुम्हाला दोन चित्रांमधला फरक शोधायचा असतो तर काही चित्रांमध्ये लपलेल्या काही वस्तू शोधायच्या असतात.

आता आपण असाच एक फोटो बघणार आहोत ज्यात पाच फरक लपलेले आहेत. हेही वाचा - संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Optical illusion : एकाग्रतेचा कस लावतील हे दृष्टिभ्रमाचे खेळ

आता तुम्ही जो फोटो पाहिला त्यात एक मुलगा व्हिडिओ गेम खेळत बसला आहे. मुलाच्या हातात रिमोट आहे व समोर स्क्रीन आहे. याशिवाय मुलाच्या बाजूला एक छोटीशी कॉपी ठेवली आहे. त्यासोबतच एक पेन्सिलसुद्धा आहे. ही चित्रे दिसायला सारखी असली तर त्यात ५ फरक आहेत.

तुम्ही ३० सेकंदांत या चित्रातील ५ फरक शोधून काढलेत का ? खरंच तुम्हाला हे फरक दिसले असतील तर तुमची नजर तीक्ष्ण आहे. पण तुम्हाला हे फरक दिसले नसतील तर आता आम्ही तुम्हाला मदत करू. चला तर माग पाहू या काय आहेत हे फरक.

Optical Illusion

Optical Illusion

पहिला फरक तर स्पष्टपणे दिसतोय. पहिल्या चित्रात स्क्रीनवर गेम ओव्हर असे दिसत आहे. दुसऱ्या चित्रात स्क्रीनवर गेमचे चित्र दिसत आहे. या मुलाकडे जे पुस्तक आहे त्यावर पहिल्या चित्रात दोन्ही पानांवर काहीतरी लिहिलेले आहे. दुसऱ्या चित्रात मात्र एकाच पानावर लिहिले आहे.

तिसरा आणि चौथा फरक त्या मुलाच्या चेहऱ्यावर आहे. त्याचे तोंड आणि भुवई येथे हे फरक दिसतील. पहिल्या चित्रात मुलाच्या डोक्यावर गुलाबी रिंग दिसेल जी दुसऱ्या चित्रात नाही.