Mental Health: Tips for parenting
Mental Health: Tips for parentingesakal

Mental Health: टीनेजमधल्या 'या' चुकीच्या सवयींमुळे येईल डिप्रेशन; मुलांनो, वेळीच सावध व्हा!

या सवयीमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. भविष्यात त्यांना अनेक आजारांचा सामनाही करावा लागू शकतो.

टीनेज म्हणजे किशोरावस्था. माणसाच्या आयुष्यात अनेक टप्पे असतात. त्यातलाच एक म्हणजे किशोरावस्था. ( Teenage) बालवयातून पुढच्या टप्प्यात पाऊल ठेवणाऱ्या मुलांच्या आयुष्यात यावेळी महत्वाचे बदल घडत असतात. मुलांच्या जीवनातील ही एक अशी अवस्था ज्यात त्यांच्या पर्सनॅलिटीचा विकास होत असतो. मुलांमध्ये या वयात बाहेरच्या जगाकडे आकर्षण वाढतं. आपण आता मोठे झालो आहोत आपल्या मनासारखं वागायला मोकळे आहोत असं मुलांना वाटायला लागतं. त्यामुळे या वयातील मुलांची पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. (Parent Should take care of their kids in teenage)

टीनेजर मुलांना पालकांनी कसं सांभाळावं ?

टीनेजर मुलांवर त्यांच्या मित्रमंडळीचा आणि आजूबाजूच्या वातावरणाचा जास्त प्रभाव असतो. याच वयात मुलं घराबाहेर पडून त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक गोष्टींचं अनुकरण करायला शिकतात. अशा वेळी त्यांना उशीरा रात्रीपर्यंत जागायची आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायची सवय लागू शकते. या सवयीमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. भविष्यात त्यांना अनेक आजारांचा सामनाही करावा लागू शकतो.(How to handle Kids in Teenage)

Mental Health: Tips for parenting
Stress Free Life : तणावमुक्त राहायचं? मग आहारात करा याचा समावेश

टीनेजर मुलांवर ओटावा विश्वविद्यालयातील संशोनधकर्त्यांनी विशेष अभ्यास केलाय. उशीरा रात्रीपर्यंत जागून मुव्हीज बघणे,पार्टी करणे किंवा उशीरा रात्रीपर्यंत जागून अभ्यास करणेही मुलांच्या मानसिक आरोग्याला धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांना रात्री लवकर झोपण्याची सवय लावावी. मुलं सकाळी लवकर उठूनही त्यांचा अभ्यास करू शकतात. सकाळी केलेला अभ्यास दीर्घ काळ लक्षात राहातो आणि मुलांची बुद्धी कुशाग्र बनते. त्यामुळे पालकांनी मुलांना उशीरा जागून अभ्यास करण्याऐवजी सकाळी उठून अभ्यास करण्याची सवय लावावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com