Stress Free Life : तणावमुक्त राहायचं? मग आहारात करा याचा समावेश

Stress Free Life : तणावमुक्त राहायचं? मग आहारात करा याचा समावेश

नागपूर : काम आणि तणाव हे समीकरण कोणासाठीही नवीन नाही. कोणाला कामामुळे तणाव येतो तर कोणी काम करायचे आहे याच विचाराने तणावात येतात. तर कुणाला उगाच तणाव घेण्याची सवय असते. कोरोनानंतर मात्र यात आणखीनच वाढ झाली आहे. कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. कुणाला व्यवसाय बंद करावा लागला तर कुणावर रोजच्या जेवणासाठी संघर्ष करण्याची वेळ आली. आर्थिक तंगीमुळे यात आणखीनच वाढ झाली.

कोरोना कमी झाला असला तरी ताण काही कमी झालेले दिसत नाही. अनेक कंपन्यांनी लोकांना कामावरून कमी केले. तर काही कंपन्या हळूहळू लोक कमी करीत आहे. यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर ताण वाढत चालला आहे. पगार वाढ नाही, आहे तितक्या पगारात काम करा. रोजच्या कामासह अतिरिक्त काम कर्मचाऱ्यावर लादले जात आहे. यामुळे कर्मचारी वर्ग तणावात दिसून येतो.

Stress Free Life : तणावमुक्त राहायचं? मग आहारात करा याचा समावेश
मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो

तणाव कमी करण्यासाठी तसेच दूर करण्यासाठी प्रत्येकजण संगीत, व्यायाम, योग आणि ध्यान करतात. परंतु, तणावमुक्त होण्यासाठी व्हिटॅमिन युक्त पदार्थांचे सेवनही फायदेशीर ठरू शकते. या पदार्थांचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते व निरोगी राहण्यास मदत होते. तेव्हा तणावमुक्त राहण्यासाठी कोणते पदार्थ खावे हे आज आपण जाणून घेणार आहोत...

संत्री

व्हिटॅमिन सी ने उपयुक्त संत्रे स्ट्रेस हार्मोन्स कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. संत्री उच्च रक्तदाब नियंत्रित करतो तसेच तणाव कमी करण्यास मदत करतो.

पालक

पालक ही पौष्टिक हिरवी भाजी आहे. पालकामध्ये कॅल्शिअम, बी जीवनसत्त्वे, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. पालक ताण आणि चिंता दूर करण्यास मदत करते. यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे वजन कमी करणे आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे.

Stress Free Life : तणावमुक्त राहायचं? मग आहारात करा याचा समावेश
अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना परत आणण्यात दर्यापूरच्या लेकीचा सहभाग

अंडी

अंडी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. अंडीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अमीनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे ताण कमी करण्यास मदत करतात. त्यात असलेले कोलीन मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसेच तणावातून सुटका होते.

एवोकॅडो

एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन बी भरपूर असते. जे तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. हे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि पोटॅशिअममध्ये देखील समृद्ध आहे, जे रक्तदाब कमी करते आणि तणाव दूर करते.

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने ताण कमी होते. तणावात असताना पेशींना निरोगी ठेवण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सची आवश्यकता असते.

Stress Free Life : तणावमुक्त राहायचं? मग आहारात करा याचा समावेश
रात्रीस खेळ चाले : वाळू होय काय कुबेराचा खजिना?

अश्वगंधा

अश्वगंधा ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याच्या सेवनाने केवळ तणाव दूर राहत नाही तर शरीर देखील मजबूत राहते. तणावामुळे झोपेवर सर्वाधिक परिणाम होतो. तणावातून मुक्त राहायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी अश्वगंधाचे सेवन करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com