Sex Education संदर्भात मुलांसोबत बोलायचंय? या टिप्स फॉलो करा, संकोच वाटणार नाही

खरं तर मुलाना लैगिंक शिक्षण देणे, यापासून भारतीय पालक दूरच राहतात. क्वचित असे पालक असतील जे आपल्या मुलाशी सेक्सबद्दल उघडपणे बोलतात.
sex education
sex educationsakal

सेक्सचे नाव ऐकताच लोकांचे कान उभे राहतात. देशाबाहेर सेक्स हा शब्द सर्रास प्रचलित आहे, पण भारतात बोलायचे झाले तर लोक सेक्स हा शब्द उच्चारताना आपला आवाज मंद करतात. आजही भारतातील लोक सेक्स या शब्दाबद्दल उघडपणे बोलण्यास कचरतात. खरं तर मुलाना लैगिंक शिक्षण देणे, यापासून भारतीय पालक दूरच राहतात. क्वचित असे पालक असतील जे आपल्या मुलाशी सेक्सबद्दल उघडपणे बोलतात.

प्रत्येक गोष्टीबद्दल मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात, बऱ्याचदा पालक मुलांना प्रश्नांची उत्तरे देतात पण सेक्सबद्दल कोणतीही माहिती देत नाहीत, त्यामुळे मुलांना याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. (parent should talk to teen about sex and give sex education)

sex education
मुलांनो, लग्नाआधीच या ५ सवयी सोडून द्या नाहीतर...

सेक्सुअल हेल्थ एजुकेशन कॉर्डिनेटर लॉरेन ओकोनेल म्हणतात की तरुण पिढीला लैंगिकतेबद्दल खूप काही जाणून घ्यायचे असेल तर याचा अर्थ असा नाही की त्यांना ते करायचे आहे. त्याला याबद्दल जाणून घ्यायचे आहे कारण या विषयावर बरेच काही लपून बोलल्या जाते, ज्यामुळे त्याच्या मनात याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिक वाढते. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की मुलांना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे जेणेकरून ते लहान वयात सेक्सुअल अॅक्टिविटीजमध्ये गुंतू नयेत.

लॉरेनने सांगितले की आजच्या काळात तरुण पिढीमध्ये सेक्स चॅटिंग करणे खूप सामान्य झाले आहे ज्यामुळे कधी कधी याचे चुकीचे परिणाम भोगावे लागतात. अशा परिस्थितीत, पालकांनी आपल्या मुलांशी लैंगिक संबंधांबद्दल बोलणे महत्वाचे आहे. लॉरेनने पालकांसाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत जेणेकरुन ते आपल्या मुलांना कोणतेही संकोच न करता लैंगिक शिक्षण देऊ शकतील.

sex education
World No Tobacco Day 2022 : धूम्रपान तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकते
  • स्वतःला प्रश्नांसाठी तयार करा, जेणेकरून तुम्हाला राग येणार नाही आणि त्यांना गप्प करू नका.

  • तुमच्या मुलाने तुम्हाला सेक्सशी संबंधित कोणताही प्रश्न विचारल तरी त्यावर जास्त रिअॅक्ट करू नका.

  • कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार देऊ नका, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल जास्त माहिती नसेल, तर मुलाला स्वतःहून त्याबद्दल माहिती गोळा करण्यास सांगा.

  • तुमच्या पाल्याला पालक म्हणून नव्हे, तर मित्र किंवा तज्ञाप्रमाणे समजावून सांगा.

  • मुलांना शरीराच्या अवयवांचे वर्णन करताना योग्य भाषा वापरा. जर तुम्ही शरीराच्या अवयवांना इतर कोणत्याही नावाने संबोधत असाल तर त्यांना असे वाटेल की शरीराच्या अवयवांचे योग्य नाव वापरणे चुकीचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com