पालकत्वाच्या ताणाचा लैंगिक इच्छांवर होतो परिणाम?

घर आणि मुलं यांची जबाबदारी पार पाडत असताना स्त्रियांना तारेवरची कसरत करावी लागते.
parents with daughters.jpg
parents with daughters.jpg

घरात लहान मुलांच्या खेळण्याचा आणि स्त्रीच्या हसण्याचा आवाज आला की त्या घराचं गोकूळ झालं असं म्हटलं जातं. घरात लहान मुलं असली की संपूर्ण दिवस कसा निघून जातो कळतच नाही. परंतु, या मुलांचं संगोपन आणि देखभाल करण्यातच स्त्रियांचा सगळा वेळ जातो. अनेकदा घर आणि मुलं यांची जबाबदारी पार पाडत असताना स्त्रियांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे सहाजिकच या सगळ्या कामाचा भार त्यांच्यावर पडतो. परिणामी, त्यांच्या शारीरिक व मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. इतकंच नाही तर, या ताणाचा परिणाम स्त्रियांच्या लैंगिक इच्छांवरही होत असल्याचं म्हटलं जात आहे. (parenting-stress-in-women-takes-its-toll-on-intimate-desire)

शारीरिक गरजांमध्ये सेक्स लाईफलादेखील तितकंच महत्व आहे. परंतु, पालकत्वाची जबाबदारी स्वीकारलेली अनेक जोडपी या शारीरिक गरजेकडे दुर्लक्ष करतात. किंवा, काही तणावपूर्व परिस्थितीमुळे सेक्सकडे दुर्लक्ष होतं. विशेष म्हणजे यात खासकरुन पालकत्वाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या महिलांच्या सेक्स लाईफवर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच महिलांच्या सेक्स लाईफवर पालकत्वाचा ताण कसा येतो ते पाहुयात.

parents with daughters.jpg
WHOच्या मान्यतेनंतरही चीनच्या लसीकडे देशांची पाठ

पहिल्यांदाच आई झालेली स्त्री -

आई होणं हा जगातील सर्वात सुखद अनुभव आहे. परंतु, आई झाल्यावर स्त्रीची जबाबादारी दुप्पटीने वाढते. तिचं लक्ष सतत आपल्या बाळाकडे असतं. त्यातच पहिल्यांदाच आईपणाचा अनुभव घेत असताना ती गोंधळलेली असते. त्यामुळे अनेकदा तिच्यावर मानसिक ताणही येतो. विशेष म्हणजे बाळाच्या संगोपनात तिचे दिवस जात असल्यामुळे सहाजिकच तिचं सेक्स लाईफकडे दुर्लक्ष होतं. मात्र, या काळात पतीने तिची मानसिक व शारीरिक स्थिती समजून तिला पाठिंबा देण्याची गरज आहे.

नोकरदार महिलांच्या सेक्स लाईफवरही होतो पॅरेंटिंगचा परिणाम -

जर्नल सेक्स रोल्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये नोकरदार महिलांच्या सेक्स लाईफवरही पॅरेंटिंगचा परिणाम होतो. एकीकडे ऑफिसची जबाबदारी, दुसरीकडे घर आणि मुलांचं संगोपन यात स्त्रियांची दमछाक होते. त्यामुळे सहाजिकच तिचंही सेक्स लाईफकडे दुर्लक्ष होतं. तसंच ज्या स्त्रिया आपल्या बाळाला पाळणाघरात ठेवतात त्या स्त्रियांची द्विधा मन:स्थिती असते. दिवसभर बाळ आपल्यापासून दूर असल्यामुळे घरी गेल्यानंतर स्त्री आपल्या बाळाकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे अशा स्त्रियांना स्वत:साठी किंवा पतीसाठी स्वतंत्र वेळ काढता येत नाही.

parents with daughters.jpg
'सजीवसृष्टी नष्ट होण्यामागे एलियन ठरतील कारण'

पालकत्वाचा ताण आल्यास पती-पत्नीने काय करावं?

सगळ्यात प्रथम आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे बाळाचं संगोपन. बाळाच्या संगोपनाची जबाबदारी केवळ स्त्रियांची नसून पुरुषांचीदेखील आहे. त्यामुळे बाळाची काळजी, त्याच्या संगोपनाची जबाबदारी आई-वडिलांनी वाटून घेतली पाहिजे. बाळाला ब्रेस्ट-फिडिंग करं स्त्रियांचं काम आहे. त्यामुळे बाळाच्या खाण्यापिण्याची काळजी आईने घ्यावी. पण, त्यानंतर अन्य कामं वडिलांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे स्त्रियांचा अर्धा भार हलका होतो. प्रेग्नंसीनंतर स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल झाले असतात हे बदल पती-पत्नी दोघांनीही स्वीकारले पाहिजेत. त्यामुळे महिलांना त्यांच्या शरीरावर ट्रोल करणं पुरुषांनी बंद केलं पाहिजे. या ट्रोलिंगचा परिणाम स्त्रियांच्या मानसिकतेवर होण्याची शक्यता अधिक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com