Parenting Tips : तुमचं मुल उलट उत्तर देऊ लागलं का? ट्राय करा 'या' टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parenting Tips

Parenting Tips : तुमचं मुल उलट उत्तर देऊ लागलं का? ट्राय करा 'या' टिप्स

When The Child Starts Giving The Opposite Answer : टिनेज मुलांना योग्य आणि आदरयुक्त बोलायला शिकवायला फार मेहनत लागते. स्मार्टफोन आणि टीव्हीमुळे मुलांची भाषेला कंट्रोल करणं अजूनच कठीण झालं आहे. पालक मुलांच्या या वागण्याने काळजीत असतात. पण अशावेळी त्यांनी अधिक धैर्याने आणि संयमाने वागायला हवे.

Parenting Tips

Parenting Tips

अशावेळी पालकांनी कसं वागावं, जाणून घ्या

  • आजकाल मुलं जास्तीत जास्त वेळ इलेक्ट्रॉनिक डिवाइस सोबत घालवतात. त्यांना पालकांच्या सुचना, सल्ले बोर वाटतात. पण अशा परिस्थितीत पालकांनीच पुढाकार घेऊन मुलांशी संवाद साधावा.

हेही वाचा: Parenting Tips पांडा पॅरेंटिंगचे फायदे

Parenting Tips

Parenting Tips

  • मुलांना रागवण्या ऐवजी समजवावं. जर मुलांच्या वागण्यावर पालकही उलट उत्तर द्यायला लागले तर मुलं त्यांचा आदर करणं बंद करतात.

हेही वाचा: Parenting Tips : पालकांच्या 'या' ६ सवयींनी संपते मुलांचे 'फ्यूचर'

  • मुलांचे मित्र बनण्याचा आग्रह धरण्याऐवजी पालक बनून समजून घेणं आणि सांगणं आवश्यक आहे. आजकाल पालक मुलांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करतात, पण मुलं त्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे मित्र बनण्याआधी पालक बनून चांगलं वाईट समजून सांगणं आवश्यक आहे.

टॅग्स :parenting