Parenting Tips: आईवडिलांमधील भांडण 'नॉर्मल' समजणं बंद करा, मुलांवर होतात हे परिणाम

भारतीय लग्न संस्कृतीमध्ये नातं टिकवण्याला खूप प्राधान्य दिलं जातं.
Parenting Tips
Parenting Tipsesakal

Parenting Tips : भारतीय लग्न संस्कृतीमध्ये नातं टिकवण्याला खूप प्राधान्य दिलं जातं. अनेकदा आपण आपल्या आईबाबांना भांडतांना बघितलं असेल, दोन माणसं घरात आली की भांड्याला भांड हे लागतच, हरकत नाही पण या वादाचा रोख किती तीव्र आहे यावरतीही गोष्टी अवलंबून असतात.

Parenting Tips
Hyper Parenting : पालकांच्या अति काळजीमुळे बिघडतेय तरुण पिढी? या चुका टाळा

आपल्या पालकांचे वाद व्हायला लागले की मुलं घाबरून जातात, कुठेतरी याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो.. अशा वेळेस, त्यांना “ठिके.. हे नॉर्मल आहे किंवा तू याच्याकडे लक्ष देऊ नकोस.. तू आपल्या अभ्यासावर लक्ष दे” असे सल्ले दिले जातात..

Parenting Tips
Travel Tips : हिवाळ्याच्या सुट्यांमध्ये कुठे जायचा प्रश्न पडलाय? अंदमानमधल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

पण याचे मुलांवरती वाईट परिणाम होऊ लागतात. त्यांच्या मनात अनेक ग्रह निर्माण होतात.. आपल्या पालकांचं जोडीदार म्हणून नातं कसं आहे यावरती मुलं बाकीच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरवतात.

Parenting Tips
Vastu Tips: घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे? काय सांगितलंय वास्तुशास्त्रात जाणून घ्या...

जर त्यांचा एकमेकांच्या प्रति दृष्टिकोन संशयी असेल तर मुलांचाही तोच दृष्टिकोन होतो किंवा दोघात छान मैत्री असेल तर तसा मुलांचा दृष्टिकोन बदलतो. अशात मुलांवर नक्की कोणते परिणाम होतात हे सांगतांना सायकोलॉजीस्ट निकोल लेपेरा यांनी ट्वीट शेयर केलं आहे.

Parenting Tips
New Year Astro Tips : एका वर्षात पडणार पैशाचा पाऊस! नवीन वर्षात करा हे उपाय

1. दृष्टिकोन:

आपल्या आयुष्यात आपण बघितलेलं पहिलं नातं कोणतं असेल तर ते आपल्या आईबाबांच असतं. या नात्यावरून साधारण मुलं स्वतःसाठीचा, एकंदरीत कोणत्याही नात्याचा आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरवतात आणि जर नातं तितकं चांगलं नसेल तर मुलांना जगही तितकं चांगलं वाटत नाही.

Parenting Tips
Astro Tips: या दोन दिवशी अगरबत्ती लावल्यास होऊ शकते तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

2. मुल इंट्रोव्हर्ट होतात

एकंदरीत घरातच क्लेशाच वातावरण असेल तर मुलं बाहेरही बोलणं टाळतात, अनेकदा त्यांना मदत हवी असते, काही सांगायचं असतं पण ते ते करू शकत नाही. लोकांना समजून घेणं त्यांना कठीण होतं, स्वतःचे मन, आपल्या गरजा याविषयी बोलता येत नाही.

Parenting Tips
Sakal Vastu Property Expo : बाणेरमध्ये ‘सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो’

3. मानसिक ट्राॅमा:

अनेकदा पालक आपल्या मुलांना आपल्या भांडणात उगाच ओढून आणतात, त्यांना उगाच कोणाच्यातरी एकच्या बाजूने बोलायला प्रवृत्त करतात या सगळ्यामुळे मुलांना मानसिक ट्राॅमा येऊ शकतो.

Parenting Tips
Bone Health : सावधान ! हे पदार्थ तुमची हाडे खिळखिळी करतात

4. पालकांबद्दल राग:

बऱ्याचदा अनेक लोकांच्या मनात आपल्या पालकांबद्दल खूप राग किंवा चिडचिड असते, ती का असते याचं असं कोणतं क्षणिक कारण नसतं पण काहीतरी चिडचिड होत असते.. याच मूळ कारण म्हणजे योग्य वयात पालकांशी न तयार झालेलं नातं.. त्यामुळे पालकांना समजून घेणं कठीण होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com