esakal | मायबाप हो! 'या' चूका टाळा ; मुलं नेहमी ऐकतील तुमचं |Parenting Tips
sakal

बोलून बातमी शोधा

मायबाप हो! लक्षात ठेवा 'या' गोष्टी; मुलं नेहमी ऐकतील तुमचं

मायबाप हो! लक्षात ठेवा 'या' गोष्टी; मुलं नेहमी ऐकतील तुमचं

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सहसा सर्वच लहान मुलांना हट्ट करण्याची सवय असते त्यामुळे मुलांना सांभाळणे अजिबात सोपे काम नसते. हट्टी मुलांना समजावणे म्हणजे पालकांसमोर खूप मोठे आव्हान असते. कित्येकवेळा अशा मुलांच्या हट्टीपणामुळे पालकांची शिकवण आणि संस्कारांवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मुलांच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर ते आणखी हट्टी होतात. भारतीय पालक मुलांच्या बाबतीत खूप कडक शिस्तीचे असतात. कित्येकवेळा आपल्या मुलांना सुधारण्याच्या नादात ते अशा चूका करतात ज्याचा परिणाम अगदी उलटा होता. जाणून घेऊ हट्टी मुलांना पालकांनी कसे समजावले पाहिजे.

हेही वाचा: कोरोनाकाळात डेटवर जाताना काय काळजी घ्यावी?

मुलं काय म्हणतायेत ते आधी नीट ऐका :

जर तुम्हाला वाटतं असेल की तुमच्या हट्टी मुलांनी तुमचे ऐकावे तर त्यासाठी तुम्हाला आधी लक्ष देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. दृढ इच्छाशक्ती असणाऱ्या मुलांची मत पण तितकीच निर्भिड असतात त्यामुळे कित्येकवेळा ते भांडण करतात. जर तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकले नाही तर ते आणखी हट्टीपणा करतात. मुलं जर हट्ट करत असतील तर शांतपणे आणि थोड धीर ठेवून त्यांचे म्हणणे ऐकूण घ्यावे आणि त्यांचे बोलणे पूर्ण होईपर्यंत त्यांना मध्ये तोडू नका.

मुलांवर सक्ती/ जबरदस्ती करू नका :

जर तुम्ही तुमच्या मुलांवर कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करत असाल तर त्यांचा स्वभाव बंडखोरी होऊन जातो. हीच सवय त्यांना पुढे जाऊन हट्टी बनवू शकते. मुलांना कोणतीही गोष्ट जबरदस्तीने करायला सांगितले तर त्यांना जे काम करू नका सांगितले आहे तेच काम ते करतात. मुलांवर कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करण्याऐवजी त्यांच्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या आवडी-निवडीमध्ये रुची दाखविल्यास तुमची मुलं तुम्हाला सर्व गोष्टी स्वत:च सांगतील आणि त्यानंतर काय चूक, काय बरोबर? हे तुम्ही त्यांना प्रेमाने समजावू शकता

हेही वाचा: हेअर डायमुळे कमी वयात केस पांढरे होण्याचा धोका?

मुलांना पर्याय द्या :

मुलांना ऑर्डर देण्याऐवजी त्यांना सूचना आणि पर्याय द्या. मुलांना जबरदस्तीने झोपविण्यापेक्षा त्यांना ''झोपताना कोणती गोष्ट ऐकायला आवडेल असे विचारा', तरीही तुमच्या मुलांनी ऐकले नाही तर थोडा धीर धरा. तुम्ही त्याला सांगू शकता की 'हा पर्याय त्यांना दिलाच नव्हता'. तुमचे म्हणणे त्याला वारंवार सांगा पण, ओरडू किंवा चिडू नका. शेवटी तुमचं मुलं हट्टीपणा सोडून देईन.

शांतपणे बोलून तुमच्या मनाप्रमाणे काम करून घ्या :

जर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही मुलांवर ओरडणार असाल तर तुमची मुलंही तसेच उत्तर देतील. मुलांसोबत बोलताना कोणताही वाद ना घालता विषय काहीतरी निष्कर्षापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करा. नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांना काही समजावयचं असेल तर तेव्हा अजिबात वाद घालू नका. मुलांसोबत त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये सहभागी व्हा, त्यामुळे हळू हळू ते तुमच्या हिशोबाने वागू लागतात

हेही वाचा: पार्टनरला या सवयी आहेत? लग्न करण्याची घाई करू नका अन्यथा...

मुलांचा सन्मान करा :

जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुलांनी तुमचा सन्मान करावा तर तुम्हीही त्यांचा सन्मान करायला हवा. जबरदस्तीने सांगितेल्या गोष्टी मुलं कधीच ऐकतं नाही. कोणत्याही कामांमध्ये मुलांची मदत मागा. मुलांसाठी एक नियम ठरवा ज्यामध्ये अजिबात नरमी दाखवू नका. त्यांच्या भावनांना आदर द्या, त्यांचे विचार धुडकावून लावू नका. तुमची मुलं जे काम स्वत:हून करतात ती त्यांना करू द्या. त्यामुळे तुम्ही त्यांचावर विश्वास ठेवता याची जाणीव त्यांना होईल.

मुलांसोबत काम करा :

हट्टी मुलं किंवा अडमुठ्ठेपणा करणारी मुलं जास्त संवेदनशील असतात आणि इतरांचे वागणे त्यांच्यासोबत कसे असते याचा ते खूप विचार करतात. त्यामुळे तुमचा आवाज, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचे शब्द काळजीपुर्वक वापरा. जेव्हा तुमचे वागणे त्यांना पटत नाही तेव्हा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उलट उत्तर देतात आणि अशा वेळी पालक रागवितात. उदा. 'तु हे कर', 'तुला हे करू नको, मी सांगितले होते ना' ऐवजी 'चल, आपण असे करू या', 'असे करू या का?' असे बोला. तुम्हाला मुलांकडून काही काम करून घ्यायचे असेल तर थोडी मजेदार पध्दतीने करुन घ्या.

एक हाताने द्या एका हाताने घ्या :

मुलांसोबत बोलताना काही वेळा सौदा करणे गरजेचे आहे. जेव्हा मुलं आपल्या मर्जीच्या गोष्टी नाही मिळत तेव्हा ते हट्टीपणा करतात. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांचा मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. अशावेळी थोडं हुशारीने आणि व्यावहारिकपणे मुलांशी बोलून पर्याय शोधा. उदा. जक तुमच्या मुलं योग्य वेळी झोपण्यासाठी तयार नसेल तर त्यांच्यावर दबाव टाकण्याऐवजी थोडी नरमी दाखवा आणि पण थोड्या वेळाने झोपण्याचे आधी मुलांकडून कबूल करुन घ्या. म्हणजे दोघांच्या मागण्या पूर्ण होतील.

loading image
go to top