Parenting Tips : वयात आलेल्या मुलांना मनी सेव्हिंगची सवय लावा, पण कशी ते वाचा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parenting Tips

Parenting Tips : वयात आलेल्या मुलांना मनी सेव्हिंगची सवय लावा, पण कशी ते वाचा!

मुलं वयात येत असताना सर्वात जास्त काळजी असते ती त्यांच्या मनाची. कारण, पौगंडावस्था हे सहसा अतिशय संवेदनशील वय असते. किशोरवयात गेल्यावर मुलांचे बालपण तर संपुष्टात येतेच. पण त्यांच्या आयुष्यातही अनेक बदल पाहायला मिळतात. विशेषतः टीनएज मुलींमध्ये मुलींना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.

मुले गोंधळलेल्या अवस्थेत असतात. त्यांच्या मनाची अवस्था त्यांनाच कळत नसते. याच वयात मुले वाईट गोष्टींकडे भरकटत असतात. इतर मित्र-मैत्रिणींच्या पुढे इंप्रेशन पाडण्यासाठी किंवा ग्रूपमध्ये वरचढ राहण्यासाठी मुली पैशांची उधळण करत असतात. त्याला वेळीच आवर घातली गेली नाही तर मुलींची हि सवय त्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते.

टीनएजमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक गोष्टी मुलांसाठी नवीन असतात. अशा परिस्थितीत कॉलेज जाणाऱ्या मुलींना मनी मॅनेजमेंटच्या टिप्स देणं खूप गरजेचं आहे. त्यामूळे त्यांना आर्थिक नियोजन आणि स्वावलंबन कसे शिकवायचे हे पाहुयात.

बँकिंग शिकवा

शाळा संपल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेत असताना बहुतेक मुलं बँकिंगची माहिती नाही. तुम्ही तुमच्या मुलांना ऑनलाइन बँकिंग, बँक खाते उघडण्यापासून ते क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरण्यासारख्या मूलभूत गोष्टींबद्दल माहिती देऊ शकता.

बजेट मॅनेजमेंट

अनेक वेळा मुले सतत पॉकेटमनी मागत असतात. त्यामुळे मुलांना बजेट मॅनेजमेंट करता येत नाही. अशा परिस्थितीत मुलीला महिन्याच्या खर्चाचे बजेट बनवून बजेटनुसार पैसे देण्याचा सल्ला द्या. जेणेकरून तुमची मुलगी पैशाची उधळपट्टी करणार नाही.

सेव्हिंगची सवय

वयाच येणाऱ्या मुलांना बचत शिकवणे देखील खूप महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांना रोज थोडे पैसे वाचवण्याचा सल्ला द्या. तसेच हे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवण्याचा सल्लाही द्या. ज्यामुळे तुम्ही मुलांना बचतीच्या टिप्स देऊ शकाल तसेच तिचे भविष्य सुरक्षित करू शकाल.

क्रेडिट रेटिंगची माहिती

भविष्यात मुलांना देखील बँकेकडून कर्ज घेण्याची आवश्यकता असू शकते. त्यामूळे तुम्ही मुलीला क्रेडिट रेटिंगची माहिती आधीच देऊ शकता. मुलीला सांगा की चांगले क्रेडिट रेटिंग ठेवल्याने लोकांना कर्ज आणि क्रेडिट कार्ड मिळणे सोपे होते.

राखीव निधी ठेवा

मुलांना बचत करण्याचा सल्ला द्या. मुलांना राखीव निधी आणि करीअरसाठी स्वतंत्र निधी तयार करण्यास सांगा. ज्याचा भविष्यात मुलांसाठी खूप उपयोग होऊ शकतो.